ग्राहक दर्पण :- वीज ग्राहका जागा हो. ८.
ग्राहक दर्पण :-
वीज ग्राहका जागा हो. ८.
*अन्य महत्वाच्या बाबी -*
१) विद्युत पुरवठा ६ महिन्याहून अधिक काळ तोडलेला असेल तर पुनर्जोडणी अर्ज हा नवीन अर्ज मानला जाईल. या अर्जाबरोबरच मागील देय रक्कम भरणे वा वाद मिटविणे आवश्यक राहील.
२) ग्राहकास सेवा देण्यासाठी वा रकमा वसूलीसाठी परवानेधारकास सर्व शहरी भागात किमान दररोज ८ तास उघडे राहणारे 'ग्राहक सेवा केंद्र' ठेवावे लागेल. तक्रार नोंदणीसाठी कॉल सेंटर चालवावे लागेल.
३) ग्राहकाने विनियम, ग्राहक हक्क विवरण पत्र, अटी, शर्ती, शुल्कसूची, दरसूची इ. कोणत्याही बाबींची मागणी केल्यास ती कार्यालयाने वा ग्राहकसेवा केंद्राने योग्य मूल्य घेवून त्वरीत उपलब्ध करून दिली पाहिजे.
४) वरील क्र. १ ते ८ मध्ये नमूद कोणत्याही कृति-मानकासंदर्भात विद्युत ग्राहकास वितरण परवाना धारकाकडे भरपाई मागणीचा अर्ज ६० दिवसांचे आत दाखल करावा लागेल व पोहोच घ्यावी लागेल. अर्ज मिळाल्यापासून ९० दिवसांचे आत वितरण परवानाधारकाने भरपाई दिली पाहिजे.
५) परवानाधारकाने वरील मुदतीत भरपाई न दिल्यास अथवा अर्जाची दखल न घेतली गेल्यास विद्युत ग्राहकास जिल्हा कार्यालयात स्थापित असलेल्या 'अंतर्गत तक्रार निवारण कक्षा' कडे तक्रार दाखल करावी लागेल. तेथेही ६० दिवसात निर्णय झाला नाही अथवा योग्य निर्णय झाला नाही अथवा पुरेशी उपाययोजना केली गेली नाही तर परिमंडल (झोन) कार्यालयात स्थापित असलेल्या 'ग्राहक गा-हाणे निवारण मंचा' कडे गा-हाणे दाखल करावे लागेल. मंचाचा आदेश मान्य नसेल तर विद्युत लोकपाल (ओम्बुडसमन) यांचेकडे अपील करता येईल. मंचाच्या वा लोकपालांच्या आदेशानंतर ९० दिवसात वितरण परवानाधारकाने भरपाईची रक्कम अदा केली पाहिजे.
६) विद्युत पुरवठा खंडीत केला जाण्याची शक्यता आहे अशा प्रसंगी ग्राहकास 'ग्राहक गा-हाणे निवारण मंचा' कडे तातडीने दाद मागता येईल व अशा प्रसंगी मंच अंतरिम आदेश वा मनाई देवू शकेल. ( अनाधिकृत विद्युत वापर व विद्युत चोरी हे प्रसंग वगळता)
आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,*
अजय भोसरेकर,
मा. अध्यक्ष, (विद्युत)
ग्राहक तक्रार निवारण मंच,
क्रमशः ८....
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️
*

Comments
Post a Comment