ग्राहक दर्पण :- वीज ग्राहका जागा हो. ६
ग्राहक दर्पण :-
वीज ग्राहका जागा हो. ६
ग्राहकांनी वेबसाईट, “ॲपच्या माध्यमातून देयकाची रक्कम भरणेबाबत” स्मरणात ठेवावे असे काही :-
१) विद्युत कंपनीच्या वेबसाईट आणि ॲप असून, ग्राहकांसाठी इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
२) विद्युत कंपनीच्या वेबसाईटवरून ग्राहक नवीन विद्युत जोडणीसाठी अर्ज, त्याच्या टप्प्यांवर लक्ष ठेवणे इ. गोष्टी करू शकतात.
३) ग्राहक आपले बिल वेबसाईट आणि महावितरणच्या ॲपव्यतिरिक्त विविध वेब प्लॅटफॉर्म्सच्या उदा. नेटबँकिंग, डेबिट किंवा क्रेडीट कार्ड, पेटीएम,फोनपे, गुगलपे, भीम ॲप, इ. माध्यमातून डिजिटल पद्धतीने भरू शकतात.
४) *बिलाची प्रत्यक्ष प्रत मिळणे थांबवून ग्राहक “गोग्रीन” सुविधेची निवड करू शकतात यामुळे ग्राहकांना प्रती बिलात रु.१०/- ची सूट मिळते आणि फक्त ई-बिल व SMS द्वारे मिळवू शकतात.*
५) जर वेबसाईट आणि अॅपवर ग्राहकाचे नोंदणीकृत खाते असेल तर तो निवडलेल्या प्लॅटफॉर्मवर तक्रार आणि अपघाताची माहिती नोंदवू शकतो.
६) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ग्राहकाला संपर्क तपशीलात बदल देखील करता येतो, विद्युतभार / नाव / पत्ता यातील बदलासाठी अर्ज करता येतो आणि या अर्जांच्या स्थितीवर लक्ष ठेवता येते, तांत्रिक आणि कार्यकारी डेटा बघता येतो आणि आपला अभिप्राय देता येतो.
आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,*
अजय भोसरेकर,
मा. अध्यक्ष, (विद्युत)
ग्राहक तक्रार निवारण मंच,
क्रमशः ६.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment