ग्राहक दर्पण :- वीज ग्राहका जागा हो.५
ग्राहक दर्पण :-
वीज ग्राहका जागा हो. ५
ग्राहकांनी “गुणवत्तेचा विद्युत पुरवठा व ग्राहक मंच (CGRF) बाबत” नोंद घ्यावे असे काही :-
१) सातत्याने व खात्रीशीरपणे चांगल्या गुणवत्तेचा विद्युत पुरवठा करणे विद्युत कंपनीवर बंधनकारक आहे.
२) ग्राहकाला उपलब्ध असलेला विद्युत पुरवठा २४०व्होल्ट आणि +_१५ व्होल्टचा फरक इतका असला पाहिजे.
३) विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी कंपनीला ८ तासाचे विशिष्ट मानकांचे पालन करावे लागते. जर विद्युत कंपनी हे निकष पाळू शकली नाही तर विद्युत कंपनीने ग्राहकांना विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात होणा-या विलंबासाठी रु. ५०/-प्रती तास दराने मोबदला द्यावा लागतो.
४) आपली तक्रार नोंदवल्यावर ग्राहकाने तक्रार क्रमांक मागून घ्यावा.
५) विद्युत चोरी आणि अनधिकृत विद्युत पुरवठ्याच्या व्यतिरिक्त सर्व तक्रारींच्या निवारणासाठी ग्राहक व्दिस्तरीय पद्धतीचा वापर करू शकतात.
६) ग्राहकांनी आपली तक्रारी *“ग्राहक गा-हाणे निवारण मंचाकडे”* जाऊ शकतो आणि जर मंचाकडून ही तक्रारीचे निवारण झाले नाहीतर विद्युत लोकपालाकडे तक्रार करता येते.
७) ग्राहकाला तक्रारीचा अर्ज केवळ दिलेल्या नमुन्यातच सादर करावा लागतो आणि त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.
८) तक्रारीचा अर्ज पूर्णपणे भरला पाहिजे आणि त्याबरोबर सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
९) ग्राहक मंच (CGRF OR EO) किंवा विद्युत लोकपालासमोर आपली बाजू मांडण्यासाठी ग्राहकाला *वकील नेमता येत नाही.*
१०) *मंच आणि लोकपाल यांना ग्राहकाच्या गा-हाण्याच्याबाबत २ महिन्यांच्या आत (६० दिवसात) निकाल द्यावा लागतो.*
आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,*
अजय भोसरेकर,
मा. अध्यक्ष, (विद्युत)
ग्राहक तक्रार निवारण मंच,
क्रमशः ५.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment