"देवा"चे राज्य आले गा! देवेंद्र युगाचा प्रारंभ.

 "देवा"चे राज्य आले गा!

देवेंद्र युगाचा प्रारंभ.

दीपक देशपांडे



महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ चा आजचा शेवटचा दिवस, ज्या दिवशी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ह्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि २३नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या नवनाट्याचा  शेवट करीत अखेर महाराष्ट्राचा लाडका भाऊ *देवा" चे राज्य आले गा ..*  म्हणण्याची वेळ आली आहे.

शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात आजपासून देवेंद्र फडणवीस ह्यांचे रुपाने प्रचंड  मताधिक्याने एका देवाचे हातात सत्ता सोपविण्यात आली आहे, या शपथविधी समारंभाला सन्मानणिय संत महंत यांची प्रमुख उपस्थिती तसेच पंतप्रधान,गृहमंत्री,अर्थमंत्री,  कृषीमंत्री,बांधकाम ,संरक्षणमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि ,, विविध केंद्रीय मंत्री, विविध राज्यांतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,व विविध मंत्रीमहोदय यांचेसह मिनीभारतच मुंबईत उतरले होते सोबतच सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते , अनेक उद्योजक व व्यावसायिक, अनेक खेळाडू, राजकीय  नेतेमंडळी आर्थिक, सामाजिक , राजकीय नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत, हजारो  हजारो नागरिकांच्या  उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

देवा भाऊंच्या या शपथविधी समारंभाला महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या भागातून महायुती चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची व गोपनीयतेची शपथ दिली त्यानंतर अजित पवार व एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची व गोपनीयतेची शपथ दिली यावेळी वंदेमातरम,भारत माता की जय, जय श्रीराम, शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

महाराष्ट्राचा हा महाशपथविधी सोहळा असंच या सोहळ्याचं वर्णन केले गेले आहे.

महाराष्ट्रातील नवनवीन आव्हानांना सामोरे जात देशाला सामोरं नेण्यासाठी प्रयत्न करीत राहणे आवश्यक आहे असे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंचावर आगमनाची चाहूल लागताच मोदी मोदी घ्या गजराने परिसर निनादून गेला होता आणि मंचावर आगमन होताच कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीतांचे गायन करुन करण्यात आले.

उद्घोषणा होताच  देवेंद्र फडणवीस ह्यांनी मराठीत मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस असे म्हणत संविधानाच्या रक्षणासह पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.प्रचंड उत्साहात हा शपथविधी सोहळा संपन्न झाला, सारा परिसर घोषणांनी निनादून गेला होता, राज्यपालांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले त्यानंतर , हिंदू हृदय सम्राट मान.बाळासाहेब ठाकरे, व आनंद दिघे ,यांचे स्मरण  करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर सहकार्याचा उल्लेख करीत एकनाथ गंगुबाई संभाजीराव शिंदे यांनी, उपमुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ व गोपनीयतेची शपथ घेतली , त्यानंतर अजित आशाताई आनंतराव पवार  यांनी गांभीर्यपूर्वक उपमुख्यमंत्री म्हणून शपथ व गोपनीयतेची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपस्थित केंद्रीय मंत्री आणि उपस्थितांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या, नंतर ते आपल्या कार्यालयात पोहोचले आणि पदभार स्वीकारला.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बाहेर फटाक्यांची आतिषबाजी आणि महायुतीच्या तमाम कार्यकर्ते व चाहत्यांनी केलेल्या घोषणाबाजीने संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव सोहळा संपन्न झाला. 

जनता ओरडून सांगत आहे ,देवेंद्र युगाचा प्रारंभ झाला गा, देवाचे राज्य आले गा.... जनता , भगिनी यांचा आनंद ओसंडून वाहत आहे, दिवाळी साजरी करण्यात येत आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.