निद्रिस्त ग्राहक राजाला जागा करण्यासाठी राबविलेला उपक्रम विद्यार्थी, शिक्षक, आणि पालकांच्या हितासाठीच:-मुख्याध्यापिका, सुनिता बुटे.
निद्रिस्त ग्राहक राजाला जागा करण्यासाठी राबविलेला उपक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या हितासाठीच:-मुख्याध्यापिका सुनिता बुटे
दीपक देशपांडे मूल
आज पदोपदी ग्राहकांची फसवणूक होत असताना आणि तो नाडला जात असताना ग्राहक संरक्षण कायद्याने आपल्याला एवढे प्रचंड अधिकार बहाल केले आहेत याबाबत माझ्यासारख्या व्यक्तीला ही जर आज या उपक्रमातून ही बाब माहित होतं असेल तर सर्वसामान्य माणसाला याविषयी जागरुक करण्याचा अत्यंत धाडसी आणि हितावह निर्णय घेऊन ग्राहक पंचायत मूल तालुका शाखा मूलच्या पदाधिकारी यांनी केवढे मोठे पाऊल उचलले आहे याची कल्पना येते.
खरोखरच आजही ग्राहक हा निद्रिस्त अवस्थेत असून त्याला जर राजा संबोधले जात असेल तर या निद्रिस्त ग्राहक राजाला जागा करण्यासाठी ग्राहक पंचायत मूल शाखेतर्फे राबविलेला उपक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या हितासाठीच असल्याचे स्पष्ट करीत आम्ही आणि आमचे विद्यार्थी ही बाब पालकांपर्यंत निश्चितच पोहोचवू आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देत आमची फसवणूक होणार नाही याची काळजी घेऊ अशी ग्वाही बालविकास प्राथमिक शाळा मूलच्या मुख्याध्यापिका सुनिता बुटे यांनी ग्राहक जागृती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलतांना दिली.
एक अतिशय स्तुत्य कार्यक्रम व सर्वसामान्य माणूस म्हणून उपयुक्त असणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा त्याची व्याप्ती आणि ग्राहकांचे अधिकार याबाबत ग्राहक पंचायत मूल तालुका शाखेचे वतीने राबविण्यात येत असलेल्या विद्यार्थी ग्राहक जागृती कार्याचे मनापासून कौतुक करीत त्यांच्या शाळेत हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.
मुख्याध्यापिका सुनिता बुटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्राहक पंचायत मूल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे, उपाध्यक्ष अशोक मैदमवार,सचिव रमेश डांगरे , कार्यकारिणी सदस्य मुक्तेश्वर खोब्रागडे,तसेच,शाळेची माजी विद्यार्थीनी डॉ . समिक्षा बुटे ,शाळेचे पदवीधर शिक्षक संतोष सोनवणे आदी मंचावर उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षीका, विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात रमेश डांगरे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना ग्राहक, ग्राहक संरक्षण अधिनियम आणि ग्राहकांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देताना फसवणुकीच्या प्रकाराबाबत अवगत करीत सहजगत्या विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणून असलेल्या अधिकारांची जाणीव करून दिली.
अशोक मैदमवार उपाध्यक्ष ग्राहक पंचायत यांनी ग्राहक पंचायत, ग्राहक अधिनियम आणि ग्राहकांनी घ्यावयाची काळजी, फसवणूक प्रकार याबाबत माहिती दिली.
मुक्तेश्वर खोब्रागडे यांनी शेतकऱ्यांनी बी-बियाणे खते खरेदीपासून घ्यावयाची काळजी, पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक याबाबत मार्गदर्शन केले.
"ग्राहक राजा जागा हो" हा नारा बुलंद करीत आपल्या आणि आपल्या कुटुंबाची फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी तो घरापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यकता असल्याचे स्पष्ट प्रतिपादन डॉ समिक्षा बुटे यांनी केले.
ग्राहक संरक्षण अधिनियम अस्तित्वात आल्यापासून ३८वर्षे लोटत असतांनाच आजही ग्राहक आपल्या अधिकारांप्रती जागरुक नाही तो एकसंघ नाही उलट शोषण करणारे संघटित असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आम्ही अशा उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या माध्यमातून तो यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन दीपक देशपांडे, अध्यक्ष ग्राहक पंचायत मूल तालुका शाखा मूल यांनी आपल्या प्रबोधनातून केले.
कार्यक्रमाची सुरुवात,अनघा मडावी आणि वल्लरी पाल यांनी ग्राहक गीत गायनाने केली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका, शिल्पा कापसे यांनी केले.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment