पं.स.मूल-केंद्र मारोडा अंतर्गत तिसरी शिक्षण परिषद संपन्न

 पं.स.मूल-केंद्र मारोडा अंतर्गत तिसरी शिक्षण परिषद संपन्न


दीपक देशपांडे 

दिनांक: ०३/१२/२०२४ ला केंद्र मारोडा अंतर्गत तिसरी शिक्षण परिषद जिल्हा परिषद  उच्च प्राथमिक शाळा कोसंबी येथे पार पडली 

या कार्यक्रमात उद्घाटक: मा. श्री रविंद्र  कामडी सरपंच ग्राम पंचायत कोसंबी हे होते तर अध्यक्षस्थानी सौ ज्ञानेश्वरी चौधरी  अध्यक्ष शा.व्य.स. कोसंबी आणि प्रमुख अतिथी :- कु.जयश्री गुज्जनवार,  विस्तार अधिकारी बीट मारोडा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते 

  या कार्यक्रमात आयोजक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद कोरडे  केंद्रप्रमुख केंद्र मारोडा व श्री मुरलीधर आत्राम उच्च श्रेणी मुख्याध्यापक तसेच श्री विपीन वाकडे ग्रामसेवक आदर्श ग्राम पंचायत कोसंबी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण   करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.*

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख प्रमोद कोरडे  केंद्र मारोडा यांनी केले तसेच खालील विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अध्ययन स्तर निश्चिती,शिष्यवृत्ती परीक्षा १००% विद्यार्थ्यांना बसविणे,PAT चाचणी लिंक  भरल्याबाबत आढावा,ULLAS App ,  नवभारत साक्षरता कार्यक्रम,विनोबा ॲप,शिष्यवृत्ती परीक्षा  वर्ग ५ व वर्ग ८ वा नियोजन,  निपुण भारत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान ,सखी सावित्री समिती स्थापन  व विद्यार्थी सुरक्षा समिती, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच श्री रविंद्र कामडी सरपंच ग्रामपंचायत कोसंबी यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता  वाढ कशी करता येईल यावर मार्गदर्शन केले.सौ ज्ञानेश्वरीताई चौधरी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांनी शैक्षणिक गुणवत्ता व गृहकार्य यावर मार्गदर्शन केले.

कु.जयश्री गुज्जनवार विस्तार अधिकारी बीट मारोडा  यांनी  विद्यार्थी सुरक्षा व पोक्सो कायदा ,अपार ID , NILP व ईतर सर्व प्रशासकीय विषयाची माहिती दिली.

निपून भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर खालील मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले

*कु.राखी डोणेवार*जि.प.उ.प्राथ शाळा भादूर्णी 

*घेतलेले विषय* विषयानुरूप शैक्षणिक साहित्याची मांडणी कशाप्रकारे करावी याविषयी मार्गदर्शन केले.शिक्षकांना आधुनिक युगातील कौशल्य जे 4C आहेत. Communication (संवाद), Collaboration (सहयोग), Critical Thinking (गंभीर विचार), Creative Thinking (सर्जन शिलता) या बाबत स्पष्टता येऊन भाषिक कौशल्ये कशी मुलात रुजवावीत त्यासाठी कोणत्या स्वरूपाचे साहित्य वापरण्यात यावीत यावर भर देऊन विस्तृत मार्गदर्शन करून शिक्षकांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.

कु.मनिषा गेडाम स.शि.,जि.प.प्राथ शाळा आदर्शखेडा यांनी खालील घटकावर मार्गदर्शन केले शिक्षकांना गट निहाय बसवून सर्व भाषा विषयक साहित्याची कौशल्या नुसार वर्गीकरण व प्रत्यक्ष प्रात्यक्षिका मार्फत कोणत्या साहित्याचा वापर कसा व कोणत्या अध्ययन निषपत्तीसाठी केला पाहिजे  या विषयी चर्चा करण्यात आली.

 श्री.सचिन बालमवार सर ,जि.प.उच्च प्राथ शाळा मारोडा

*घेतलेले विषय*गणित विषय शिकवताना सुरुवातीला विविध भाषानुरूप १ ते ५ ची ओळख  त्यानंतर 0 ओळख व ६ ते ९ ची ओळख झाल्यानंतर दशकाची ओळख पटवून देणे हे स्पष्ट केले.बेरीज वजाबाकी विविध अवकाशीय संबोध (वर- खाली ,लहान -मोठा, लगतची -पुढची संख्या,चढता उतरता क्रम, कमी जास्त, व इतर गणितीय संबोध) स्पष्ट करण्यात आला.

 श्री.युवराज ठाकरे वि.शि.जि.प.उ.प्रा शाळा कोसंबी

*घेतलेले विषय* गणितीय क्रिया शैक्षणिक साहित्याचा वापर करून कशा करता येतील खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी हसत खेळत गणितीय क्रिया शैक्षणिक साहित्याचा वापर करून कशा करू शकतात तसेच शाब्दिक उदाहरण कसे सोडवतील यावर विशेष मार्गदर्शन करून शिक्षकांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जि.प.उ.प्राथ शाळा कोसंबी येथील विद्यार्थ्यांनी मानले,तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत गटलेवार मुख्याध्यापक कोसंबी,श्री दत्तु कोसरे विषय शिक्षक,श्री युवराज ठाकरे विषय शिक्षक कोसंबी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परीश्रम घेतले.

केंद्रातील ४० शिक्षक,मुख्याध्यापक शिक्षण परिषदेस उपस्थित होते.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           

✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.