कृषी महाविद्यालय मूल येथे कृषी शिक्षण दिवस साजरा

 कृषी महाविद्यालय मूल येथे कृषी शिक्षण दिवस साजरा


मूल ,दीपक देशपांडे 

कृषी महाविद्यालय, मूल येथे दिनांक ०३ डिसेंबर, २०२४ रोजी “ *कृषी शिक्षण दिवस* ” साजरा करण्यात आला. कृषी क्षेत्राविषयी तरुणांमधे जागरूकता निर्माण होण्याकरिता व कृषीचे भारताच्या विकासामध्ये असणारे महत्त्व पटवून देण्याकरिता भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने, भारताचे पहिले राष्ट्रपती व केंद्रीय कृषीमंत्री, भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिवस हा “कृषी शिक्षण दिवस” म्हणून दरवर्षी साजरा करण्यात यावा असे ठरविले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. व्ही. एस. टेकाळे* हे होते. यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या दिवसानिमित्त विद्यार्थांना कृषि क्षेत्रामधे शिक्षण घेण्याचे महत्त्व व फायदे सांगितले. कृषी शिक्षण घेणे हि एक हि आपणास फार मोठी संधी मिळाली आहे. प्रामुख्याने कृषी विषय जसे कृषिविद्या, उद्यानविद्या, मृदशास्त्र, किडशास्त्र, रोगशास्त्र, कृषी अर्थशास्त्र असे विविध कृषी संलग्न विषयाचा सर्वांनी सखोल ज्ञान सर्वांनी घ्यावे असे सांगितले. कृषी क्षेत्रावर आधारीत लोक आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आहेत. मानवी जीवन जगण्यास अन्नाची फार मोठी गरज आहे ते फक्त कृषीच्या माध्यमातून पुरविल्या जाते. अन्नधान्य, फळे, भाजीपाला उत्पादन व कृषि सलग्न इतर कार्य जसे कृषी निविष्ठा पुरविणे, कृषी माल निर्यात, आयात व कृषीसंबंधी इतर व्यवसाय यामध्ये कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना फार मोठी संधी आहे असे त्यांनी सांगितले. स्वतः विद्यार्थांनी नौकरीकडे न वळता गरजू युवकांना कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देनारे कृषी उद्योजक बनावे असे आव्हान याप्रसंगी विद्यार्थांना केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, उद्यानविद्या प्रमुख, *डॉ. आर पी. गजभिये* यांनी या दिवसाचे अवचीत्त साधून विद्यार्थांना भारतीय कृषी संशोधन परिषदेचे विविध संशोधन केंद्र, केंद्रीय कृषि विद्यापीठ, राज्य कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थांना कृषी क्षेत्रामधे असणाऱ्या विविध संधीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयात कृषि पदवी घेणारा विद्यार्थी *रेवत ढोक* यांनी सुद्धा कृषी शिक्षणाच्या संधीबाबत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक *डॉ. अश्विनी गायधनी* यांनी केले यामध्ये त्यांनी कृषी दिन साजरा करण्याचे उद्देश्य व महत्त्व सांगितले. 

सदर कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे इतर प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार *डॉ. अश्विनी गायधनी* यांनी मानले.


 दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.             ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.