कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे महिला व बालसंरक्षण मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

 कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे महिला व बालसंरक्षण मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

दीपक देशपांडे मूल.

कर्मवीर महाविद्यालय, मूल व जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, चंद्रपूर तसेच सखी वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालसंरक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके मॅडम अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बनकर सर, राणी खडसे (केस वर्कर, सखी वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर), कल्पना फुलझेले (चाइल्ड हेल्पलाइन 1098, चंद्रपूर), प्रतिभा मडावी (बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर), तसेच स्मिता तिरपुडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान राणी खडसे यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी पीडित महिला व बालिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवांवर प्रकाश टाकला, ज्यामध्ये मोफत निवास, वैद्यकीय सेवा, कायदेशीर सहाय्य, समुपदेशन, संकटकाळातील तत्काळ प्रतिसाद, संकटमुक्ती सेवा आणि अत्याचारग्रस्त महिलांना गरजेनुसार दिल्या जाणाऱ्या इतर सुविधांचा समावेश आहे.

कल्पना फुलझेले मॅडम यांनी चाइल्ड हेल्पलाइन 1098 च्या माध्यमातून बालकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या सेवा आणि उपाययोजनांवर माहिती दिली. त्यांनी बाल विवाह, बाल तस्करी, बाल कामगार, बाल भिक्षेकरी आणि शोषणापासून संरक्षणाच्या उपायांवर सविस्तर चर्चा केली.

प्रतिभा मडावी मॅडम यांनी विधी संघर्षग्रस्त बालकांची निर्मिती कशी होते, ती टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची वागणूक कशी असावी, यावर मार्गदर्शन केले. तसेच, पोस्को कायदा, बाल निरीक्षण गृह, आणि बाल न्याय मंडळाचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले.

अध्यक्षीय मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. अनिता वाळके मॅडम यांनी 18 वर्षाखालील मुलामुलींना नकळत होणाऱ्या चुकांचे परिणाम स्पष्ट केले. त्यांनी शिक्षणाला संस्कारांची जोड दिल्यास अशा घटना टाळता येतील असे सांगितले. विद्यार्थ्यांनी संस्कारी जीवन जगून आदर्श नागरिक बनावे आणि समाज व देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, अशी प्रेरणा दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर मासिरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. समीर अल्लूरवार यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि असंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात महिला व बाल संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला. उपस्थित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण झाले.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.             ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.