लष्करी अळी संबंधित तक्रार करण्याची आवश्यकता नाही.

 लष्करी अळी संबंधित तक्रार करण्याची आवश्यकता नाही:-तालुका कृषी अधिकारी मूल.

दीपक देशपांडे 

मूल तालुक्यातील अनेक गावांत धान पिकावर आलेल्या लष्करी अळी मुळे शेतकऱ्यांना नुकसान झाले असून त्याबाबतचा अहवाल तालुका  कृषी अधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आला असून तो शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

याबाबत शासनाकडून निश्चित काय निर्णय होतो त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे,मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नुकसान भरपाई मिळण्यासाठी अजूनही तक्रार अर्ज सादर करीत आहेत,हे अर्ज तुर्तास सादर करण्याची आवश्यकता नाही , असे स्पष्ट मत तालुका कृषी अधिकारी, सुनील कारडवार यांनी आमच्याशी वार्तालाप करताना व्यक्त केले आहे.

 वेगवेगळ्या सेतू केंद्रावर अर्ज करण्यासाठी  शेतकऱ्यांची गर्दी दिसली त्यामुळे  आम्ही तालुका कृषी अधिकारी यांचे सोबत संपर्क साधला असता, दररोज  कित्त्येक अर्ज कार्यालयात  येत असून तालुका कृषी अधिकारी यांचे वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना सुचीत करण्यात येते की सदरहू मागणीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही,मात्र ही बाब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याने दररोज हे अर्ज दाखल केले जातच आहेत.

मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणात लष्करी अळी मुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे हे उल्लेखनीय आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2m✍️




Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.