महाब्रेकिंग:- महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला.

 महाब्रेकिंग :-महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला!

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!


दीपक देशपांडे 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ दिनांक २०/११/२०२४ रोजी पार पडली आणि दिनांक २३/११/२०२४रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत तातडीने दररोज नवनवीन चर्चा, आरोप प्रत्यारोप केले जात होते.

महायुतीच्या नेत्यांचे म्हणणे आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत होत्या ,मग मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदावरून वेगवेगळ्या चर्चा आणि विरोधकांच्या आरोपांच्या फैरी झाडून सोडले गेलेले टिकास्त्र यांमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला होता.

आज केंद्रीय निरिक्षक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या उपस्थितीत विधानभवन सभागृहात झालेल्या  भाजप कोअर कमिटी बैठकीत भाजपचा गटनेता निवडीची प्रक्रिया सुरू झाली आणि एकमताने  देवेंद्र फडणविस यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे आणि गटनेता  निवडीची प्रक्रिया सेंट्रल हॉलमध्ये गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली याप्रसंगी  केंद्रीय  निरीक्षकांचे स्वागत  करण्यात आले चंद्रशेखर  बावनकुळे या विधिमंडळ गटनेत्यांनी प्रास्ताविक केले , केंद्रीय  निरीक्षक विजय रुपानी यांनी निवड प्रक्रिया सुरू केली आणि चंद्रकांत  पाटील व सुधीर मुनगंटीवार ह्यांनी प्रस्ताव सादर केला आणि, पंकजा मुंडे ,आशिष शेलार व रवींद्र चव्हाण ह्यांनी अनुमोदन दिले व उपस्थित  सगळे नवनिर्वाचित आमदारांनी पाठिंबा दिल्यावर  देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली असून त्याची औपचारिक अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेतून करण्यात आली.

या गटनेता निवड प्रक्रिया समारंभात चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस ह्यांचे नाव प्रस्तावित करताना त्यांच्या नावाचा उल्लेख करताना देवेंद्र सरीता गंगाधर फडणवीस असा उल्लेख केला तो सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे नेला आणि इतरांनी त्यांचे समर्थन केले.व विजय रुपानी यांनी अजून कुणाच्या नावाचा प्रस्ताव आहे का? अशी विचारणा केली आणि उपस्थित सर्व आमदारांनी नकार दिल्यानंतर विजय रुपानी यांनी देवेंद्र फडणवीस ह्यांचे नावाची घोषणा केली,कोअर कमिटी सदस्यांनी देवेंद्र फडणवीस ह्यांचे स्वागत केले......

........आणि महाराष्ट्र राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड झाली आणि देवेंद्र फडणवीस ह्यांची  भाजपचे गटनेता  म्हणून निवड झाली असून गटनेता म्हणजेच महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेतील तर त्यापूर्वी आज दुपारी साडेतीन  वाजता राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी दावा दाखल करतील ,

 याप्रसंगी महायुतीचे  (भाजप+शिवसेना+राष्ट्रवादी काँग्रेस) देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिन्ही नेते उपस्थित राहतील.

शेवटी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ठरल्याने विरोधकांच्या चर्चेला ठोस उत्तर देण्यात आले आहे.

ठरलं तर मग.........देवेंद्र फडणवीस हेच होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.