मूल तालुक्यात ग्राहक जागृती सप्ताहाची सुरुवात
मूल तालुक्यात ग्राहक जागृती सप्ताहाची सुरुवात
दीपक देशपांडे
राष्ट्रीय ग्राहक दिन २४ डिसेंबर निमित्त ग्राहक जागृती सप्ताहाची सुरुवात मूल तालुका ग्राहक पंचायत तर्फे आज दिनांक १६/१२/२०२४ रोजी करण्यात आली. हा सप्ताह २५/१२२०२४ पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करुन साजरा करण्यात येणार आहे.
आज दिनांक १६/१२/२०२४रोजी मान.अजय चरडे , उपविभागीय अधिकारी मूल यांची मूल तालुका पदाधिकारी यांनी भेट घेऊन राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली,व इतरही विषयावर साधकबाधक चर्चा केली.
राशन वितरण दक्षता समितीचे गठण करण्याबाबत मागणी व कागदी कप्सवर बंदी आणण्याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे नांवे निवेदन देऊन त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी ग्राहक पंचायत मूल तालुका पदाधिकारी दीपक देशपांडे, अध्यक्ष,अशोक मैदमवार,उपाध्यक्ष, रमेश डांगरे, सचिव, डॉ, आनंदराव कुळे , प्रमोद मशाखेत्री आणि प्रकाश चलाख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तर आजच....
तहसीलदार मृदूला मोरे यांची भेट घेऊन ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती करताना हा कार्यक्रम तहसील कार्यालयात बंदिस्त सभागृहात घेण्याऐवजी एखाद्या मोठ्या गावात आयोजित करण्याची सुचना केली. ती मान्य करताना लवकरच त्यांचे नियोजन करण्याची सुचना पुरवठा विभागाला देण्यात आली.
सिलिंडर वितरणातील त्रुटी लक्षात आणून दिली असता तातडीने गॅस एजन्सी ला भेट देऊन त्यांचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता व अहवाल सादर करण्याची सुचना पुरवठा विभागाला करण्यात आली.
राशन धान्य दुकानासमोर सावलीसाठी मंडप/शेड उभारण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली, त्याबाबत राशन दुकानदारांना कळविण्याच्या सुचना तहसीलदार मृदूला मोरे यांनी पुरवठा विभागाला दिल्या.
सेतू सुविधा केंद्रात दरफलक लागले नसल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लुबाडणूक होत असल्याची बाब लक्षात आणून दिली असता तातडीने सर्व सेतू सुविधा केंद्र चालकांना पत्र देऊन दरपत्रकाचे फलक दर्शनी भागात लावून त्यांचे फोटो गृपवर टाकण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या कारकुनांना दिल्यात.
याप्रसंगी ग्राहक पंचायत मूल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे, अशोक मैदमवार उपाध्यक्ष, रमेश डांगरे,सचिव, डॉ आनंदराव कुळे, प्रमोद मशाखेत्री आणि प्रकाश चलाख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment