बातमीची दखल:- कोण म्हणतं बातमीची दखल घेतली जात नाही?
बातमीची दखल
कोण म्हणतं बातमीची दखल घेतली जात नाही?आठवडी बाजार स्थलांतरित.
दिनांक २१नोव्हेंबर रोजी आम्ही,Ddbatmi@m2Mवर....
मुख्याधिकारी साहेब आठवडी बाजार अजूनही रस्त्यावरच?
या मथळ्याखाली आम्ही वृत्त प्रसिद्ध केले होते ,त्याची लिंक खाली दिली आहे.
https://ddbatmi-m2m.blogspot.com/2024/11/blog-post_15.html
या बातमीची दखल घेत मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी ग्राहक पंचायत मूल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे यांना लवकरच आपण याबाबत कार्यवाही करणार असून ती कार्यवाही करण्यापूर्वी बाकी तयारी करण्यासाठी थोडा वेळ मागून घेतला होता.
आम्हालाही संवाद आणि समन्वयातून तोडगा काढायचा असल्यामुळे आम्ही तो वेळ देण्याची तयारी दाखवली आणि प्रशासनाने आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी वेळ घेतला परंतू आज मूलचा आठवडी बाजार महात्मा फुले मार्केट यार्डात स्थलांतरित करुन शेतकरी, व्यापारी, छोटेमोठे विक्रेते,व ग्राहक यांना एकाच ठिकाणी एकत्रित करून काही प्रमाणात थोडे कठोर होऊन निर्णय घेतल्याने काही व्यावसायिक मोठा पसारा पसरुन दुकाने थाटून बसायचे त्यांना थोड्या छोट्या जागेत व्यवसाय करावा लागल्याने नाराजीचा सूर बघायला मिळाला परंतू परिसरातील नागरिक, बाजारात येणारे शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समितीत धान घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्राॅली,ट्रक यांना रस्ता उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
आठवडी बाजार महात्मा फुले मार्केट यार्डात स्थलांतरित केल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठरविले तर ते कुठलेही कार्य यशस्वी करुन दाखवू शकतात ह्याची आज प्रचिती आली.
मात्र कुठल्याही राजकीय दबावतंत्राला बळी न पडता सातत्याने पाठपुरावा केला गेल्यास जनतेला पर्यायाने ग्राहकांना सवय लागेल आणि आठवडी बाजार महात्मा फुले मार्केट यार्डात कायम भरवला जाऊ शकेल आणि जनता आपल्या सोबत असल्याचा अनुभव येईल, याबाबत आपण निश्चिंत असावे, ग्राहक पंचायत ग्राहक हितासाठी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असणार आहे ,तशीच ती व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासकीय यंत्रणेला घ्यायला बाध्य करेलच,यांची खात्री बाळगावी.
आज ग्राहक आनंदात होते मात्र काही व्यावसायिक आणि काही विक्रेत्यांना अडचणीचे गेले, त्यांनाही अडचणीचे जाऊ नये व त्यांना व्यवसाय करणे सहजसुलभ होईल यासाठी आवश्यक व्यवस्था उभी करून हळूहळू त्यांना या नवीन व्यवस्थेची सवय ही होईलच व या व्यवस्थेशी जुळवून घेत बदललेल्या व्यवस्थेविरोधात ओरड निश्चितच कमी होईल याबाबत दूमत नाही.
प्रशासनाने आपल्या या निर्णयाची अंमलबजावणी ग्राहक जागृती सप्ताहात करुन एकप्रकारे ग्राहकांच्या हक्कासाठी महत्वपूर्ण पहल केली आहे, परिणामी नगरपरिषदमूलचे प्रशासक, मुख्याधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे,असे ग्राहक पंचायत मूल तालुका शाखा मूलच्या वतीने कळविण्यात आले आहे...
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment