मूलच्या बसस्थानकावर प्रवाशांनी जाऊच नये काय?

 मूलच्या बसस्थानकावर प्रवाशांनी जाऊच नये काय? परिसरात दुर्गंधी जनता हवालदिल.

तातडीने कारवाई करण्याची ग्राहक पंचायत मूल ची मागणी.



मूल, दीपक देशपांडे 

दोन दिवसांपासून मूलच्या बसस्थानकावर सडक्या कुजक्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना अतिशय त्रास होत असून आम्ही बसस्थानकावर जाऊच नये काय?असा प्रश्न जनता विचारू लागली आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता मूल बसस्थानक परिसरात दुर्गंधी मुळे प्रवाशांना बसस्थानकावर प्रतिक्षा करीत बसणे तर सोडाच परिसरात शिरकाव करतानाही अतिशय त्रास होत असून प्रवाशी रस्त्यावर येत आहेत, मूलच्या वाहतूक नियंत्रकांचे याबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे .

दोन दिवसांवर राष्ट्रीय ग्राहक दिन देशभर साजरा केला जात असताना आज प्रवाशी ग्राहकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना शासन व दंडात्मक कठोर कारवाई करीत बसस्थानकावर प्रवाशांना होत असलेल्या या जिवघेण्या त्रासापासून सुटका करण्यासाठी, आणि  प्रवाशांच्या  आरोग्य रक्षणासाठी योग्य  पावले उचलत तालुका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी, ग्राहक पंचायत मूल तालुका शाखा मूलच्या वतीने करण्यात येत आहे. 


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.