कृषी महाविद्यालय, मूल येथे जागतिक मृदा दिन साजरा
कृषी महाविद्यालय, मूल येथे जागतिक मृदा दिन साजरा
मूल दीपक*दीपक देशपांडे
जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून, राष्ट्रीय सेवा योजना आणि मृदा विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने कृषि महाविद्यालयाच्या मूल-मरोडा येथे *५ डिसेंबर* रोजी *जागतिक मृदा दिन* साजरा करण्यात आला. या जागतिक मृदा दिनानिमित्त *प्रश्नमंजुषा स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले होते व त्यानिमित्ताने महाविद्यालयात मातीच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण, शाश्वत माती व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब व विद्यार्थ्यांमध्ये मृदेचा होणारा व्ह्रास त्याची कारणे व त्यावर उपाययोजना यावर जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मातीची रचना, संवर्धन तंत्र आणि त्याचा अन्न उत्पादनावर होणारा परिणाम याविषयीचे ज्ञान दाखवून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला.
याशिवाय, या दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी जागतिक मृदा दिनाबद्दल आपले मत मांडले ज्यामुळे विद्यार्थ्यांना मृदा संवर्धनाच्या महत्त्वावर त्यांचे विचार आणि कल्पना व्यक्त करण्याची संधी मिळाली. *कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विष्णुकांत टेकाळे, सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय, मूल* यांनी मृदेची शाश्वतता, मृदेमध्ये होणारे प्रतिकूल बदल कमी करणे आणि पर्यावरणाच्या एकूण कल्याणामध्ये मातीची महत्वाची भूमिका अधोरेखित करणारी माहिती आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना दिली.
जागतिक मृदा दिन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अक्षय इंगोले, सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान व कृषि रसायन शास्त्र विभाग यांनी केले.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment