वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, संतप्त जनतेची मागणी ,वाघाचा तातडीने बंदोबस्त करा.

 वाघाच्या हल्ल्यात बैल ठार,  वाघाचा तातडीने बंदोबस्त करा,संतप्त जनतेची मागणी.


मूल : दीपक देशपांडे 

गेल्या काही दिवसांपासुन आकापूर- मरेगांव परिसरात वाघाची दहशत कायम असुन शनिवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान शेतात चराईसाठी नेलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आकापूर येथील नितीन पेंटेवार यांच्या शेतात घडली. मूल तालुक्यातील मरेगांव-आकापूर परिसरात मागील काही दिवसापासुन वाघाची दहशत आहे, काही दिवसांपुर्वी मरेगांव येथील एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना ता. २५ऑक्टोंबर) रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान नितीन पेंटेवार यांच्या स्वतःच्या शेतात बैल चराईसाठी पाठविले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. जवळपास १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा बैल असुन शासनाने तात्काळ नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी भेट देवुन पंचनामा केला असुन पुढील कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

  मूल तालुक्यात मागील काही दिवसांपासुन वाघाचे हल्ले वाढत आहे. अनेकांचे जिव जात आहे मात्र शासन याबाबतीत कार्यवाही करण्यात टाळाटाळ करीत असून त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे, परिणामी मानव व वन्यजीव यांतील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे व वनविभागाच्या विरोधात जनतेचा आक्रोश वाढिस लागला आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक

      ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.