सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आमदार म्हणून शपथ ....

सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आमदार म्हणून शपथ ....

 आणि मानले मतदारांचे मनःपूर्वक आभार .



दीपक देशपांडे 

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक ७डिसेंबर२४, रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधानभवनात शपथ घेतली त्यानंतर त्यांनी आपल्या मतदारांचे आभार मानले ते असे.....

आज विधानसभा सदस्य म्हणून मी सातव्यांदा शपथ घेतोय. या क्षणी ज्या भावना माझ्या मनात दाटून आल्यात त्या व्यक्त करताना मला शब्द अपुरे पडत आहेत. १९९५ ते २०२४ या तीस वर्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून दीर्घ प्रवास मी अनुभवलाय तो केवळ जनता जनार्दनाच्या प्रेमाच्या आणि आशिर्वादामुळे. आज या शुभक्षणी मला आठवण येतेय ती माझ्या दिवंगत आईवडिलांची. माझी पत्नी, मुलगी, जावई यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हा प्रवास यशस्वी झाला. जनतेच्या आशीर्वादाच्या आणि प्रेमाच्या बळावर मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष, मंत्री झालो, अनेक प्रतिष्ठेचे सन्मान मला मिळाले, अनेक आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यात आले. दुःखद क्षणी जनतेचा भावनिक आधार देखील मी अनुभवला. या क्षणी जनता जनार्दनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे क्रमप्राप्त आहे. मी त्यांच्या प्रेमाला कधीही उतराई होणार नाही. या प्रवासात माझे पक्षश्रेष्ठी, पक्षातले सहकारी, भाजपा व मित्रपक्षातले पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बद्दल देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो. 

सर्वांचे प्रेम, आपुलकी यांच्या ऋणात सदैव राहणे मला आवडेल. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत असले तरी या चार ओळी सर्वाना समर्पित करतो...

या आपुलकीच्या अपुल्या 

कसे मोल करावे कुणी 

मी मनात ठेवीन माझ्या 

अन सदैव राहील ऋणी 

सदैव आपला:-सुधीर मुनगंटीवार.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.