कृषि महाविद्यालय मूल येथे रक्तदान शिबीर

 कृषि महाविद्यालय मूल येथे रक्तदान शिबीर


मूल: २४ डिसेंबर: दीपक देशपांडे.

 राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत कृषि महाविद्यालय, मूल येथे बुधवार *दिनांक २४ डिसेंबर २०२४* रोजी *रक्तदान शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा उद्देश राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना रक्तदानाचे महत्व  पटवून देणे व समाजामधे रक्तदान बाबत जागृकता निर्माण करणे हा होता.

 या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कृषि महाविद्यालय, मूल चे *सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी केले. या प्रसंगी डॉ मोहीत बालानी ,श्री. पंकज पवार समाजसेवा अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर व त्यांचा चमु उपस्थित होता.. या शिबीरा प्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकून *३६ स्वयंसेवकांनी* रक्तदान करून सहभाग नोंदविला. 

     या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कृषि महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी शिबिरात सक्रियपणे सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक कौतुक केले.  समाजाची सेवा करण्याची विद्यार्थ्यांची भावना आणि वचनबद्धता इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतांना सामाजिक दायित्व म्हणून राष्ट्रीय योजना कार्याक्रमामध्ये अधिकाधिक सहभाग घ्यावा असे आवाहन या प्रसंगी विद्यार्थ्यांना केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.खुशाल राठोड व श्री नागेश नवघरे इतर प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.            ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.