ग्राहक राजा जागा हो,हा जागर घराघरात पोहोचावा:-प्रा.भावना टेकाम

 ग्राहक राजा जागा हो हा जागर घराघरात पोहोचावा:- प्रा.भावना टेकाम.



दीपक देशपांडे 

आज शिकल्या सवरल्या नागरिकांना सुद्धा फसवणुकीला बळी पडावे लागत असून ग्राहक आपल्या अधिकारांप्रती आणि कायद्याप्रती अनभिज्ञ असल्याचे त्याची फसवणूक झाल्यानंतर लक्षात येते , मोबाईलचा मुक्त वापर सुरू झाला असतांना समाजजागृती साठी ग्राहक पंचायत मूल चे वतीने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून आजच्या कार्यक्रमातून अतिशय मौल्यवान माहिती आमच्या आणि आमच्या विद्यार्थ्यांना सहजगत्या प्राप्त झाली आहे आणि अशा कार्यक्रमांमुळे ग्राहकांचे प्रबोधन होण्यास मदतच होते आहे, अशा शब्दांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना महाविद्यालयाच्या  प्राचार्या भावना टेकाम यांनी व्यक्त केले .

मूल तालुका ग्राहक पंचायत मूल च्या वतीने ग्राहक जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक १८/१२/२०२४ रोजी सकाळी देवनिल स्कूल ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या भव्यदिव्य सभागृहात विद्यार्थी ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , याप्रसंगी मूल तालुका ग्राहक पंचायत मूल चे पदाधिकारी दीपक देशपांडे,अध्यक्ष, अशोक मैदमवार उपाध्यक्ष रमेश डांगरे सचिव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ग्राहक, ग्राहक पंचायत, ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६आणि सुधारीत ग्राहक अधिनियम २०१९, ग्राहक अजूनही कायद्याबाबत अनभिज्ञ असल्याचे व त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू असल्याचे स्पष्ट करीत कायदा ,कायद्यातील अधिकार व न्याय मागण्यासाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा यांबाबत सखोल मार्गदर्शन, ग्राहक पंचायत मूल तालुका अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी यांना केले.

ग्राहकांना जागरुक राहून व्यवहार करण्यासाठी तयार असण्याची आवश्यकता अशोक मैदमवार उपाध्यक्ष यांनी तर सचिव रमेश डांगरे यांनी आँनलाईन फसवणूक,दुकानदारांची बनावट गिरी, पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक , हवाबंद वस्तूंची खरेदी करताना घ्यावयाची काळजी, मिठाई खरेदी करताना घ्यावयाची काळजी,वजनमापांतील हातचलाखी यांबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात, ग्राहक गीत गायनाने करण्यात आली तर स्वागत समारंभानंतर दीपक देशपांडे यांनी आपल्या वक्तव्याने आयोजनाचा उद्देश विशद करीत कार्यक्रमात रंग भरला.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.         ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.