मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

  मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! खरंय पण....मतदार राजा नाराज आहे.

शासनकर्त्यांची मनमानी  जनता सहन करणार नाही.


दीपक देशपांडे 

नुकतीच महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुक पार पड़ली असून त्याचा निकाल जाहीर झालाअसून तत्कालीन सत्तारूढ़ महायुतीला बहुमत मिळाले असले तरीही अजूनपर्यंत नवीन सरकार स्थापन होऊन त्या सरकारने पदभार स्वीकारलेला नाही अशा स्थितीत प्रशासकीय स्तरावर धडाधड नवनवीन निर्णय घेण्यात येत असून ही तर शासनाने चालवलेली मनमानी असल्याचा अनुभव जनता घेत असून याचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.

विधानसभेत बहुमत म्हणजे जनतेला त्रास दायक होणारे निर्णय घेऊ नये कारण बहुमत जनतेने दिले आहे हे विसरू नये.

कांही दिवसांपूर्वी सत्तेवर येण्याकरीता, निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून जनतेला पैसे वाटणाऱ्या पक्षांनी, सत्तेवर येताच, सदर जनतेकडूनच, निरनिराळ्या कारणांनी, सदर पैशांची वसुली सुरू केलेली आहे, 

उदाहरणार्थ :-

१) शपथ पत्राकरिता रुपये शंभर ऐवजी रुपये पाचशेचा स्टॅम्प पेपर लागेल.

२) एसटीची येणारी दरवाढ

३) दुचाकी वरील दोघांनी हेल्मेट न घातल्यास दंड

४) व्यवसायिक गॅस सिलेंडर दरवाढ.

इत्यादी अशाप्रकारे, अनेक प्रकारे व अनेक पटीने वसुली जनतेकडून होणार आहे.तरी, या विरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे*जेंव्हा की ,शहर व गावांतर्गतचे मार्गावर हेल्मेट वापरणे, ऐच्छिक करण्याची गरज आहे व तसे अधिकार राज्य सरकारला आहेत. अशास्थितीत ,सदर निवडून दिलेल्या आमदार व पक्षांना, विश्वासघात या कारणाने परत बोलविण्याची आणि दंड व शिक्षा करण्याची व  त्यांना  कायमस्वरूपी  निवडणुकीमध्ये  उभे राहण्यावर  बंदी घालण्याची गरज आहे.

लोकशाहीमध्ये  जनता मालक असून , त्यांच्या  अपेक्षेनुसारच, निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी काम करणे, कर्तव्य म्हणून, अपेक्षित आहे. परंतु, हुकूमशाही प्रमाणे कामकाज केल्या जात आहे.

मतदारांनी भरघोस मतांनी व बहुमतांनी निवडून दिले याचा अर्थ म्हणजे ५ वर्ष मनमानी पणाने सत्ता चालवणे व मतदारांना विचारात न घेता मतदार यांचे विरुद्ध निर्णय घेणे म्हणजे मतदारांच्या मताचा अपमान आहे असे नवनिर्वाचित आमदार यांना वाटत नाही काय? अशी विचारणा जनता करीत असून हा तर जनतेचा विश्वासघात असल्याचे बोलले जात आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.