बसचे स्टेअरींग फ्री झाले पण.. .!
बसचे स्टेअरींग फ्री झाले पण.. वाहकाच्या समयसूचकतेमुळे बसला अपघात होताहोता वाचला.
https://youtube.com/shorts/NobIIEhoDEQ?si=rvd7l7eIjUbhvrk7
https://youtube.com/shorts/dvf0xdI0ZkA?si=aUjD_hbAvO56Xn_-
दीपक देशपांडे
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली जवळ पुलगाव ते वर्धा-गडचिरोली ही बस दुपारी बाराच्या सुमारास सावली वरुन गडचिरोली कडे जात असतानाच बसमधील स्टेरिंग चा तांत्रिक बिघाडामुळे बस ही रस्त्याच्या कडेला गेली यात दोन ते तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती सावली पोलीसांना मिळताच त्वरित ते घटनास्थळी आले व जखमींना रुग्णालयात नेले तर इतर प्रवाश्यांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासा साठी सोडण्यात आले, अपघात झालेली पुलगाव आगाराची बस क्रमांक एमएच१३ सियू ८३३४ ही पुलगाव वरुन वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली अशी होती. सावली बसस्थानकावरुन गडचिरोली कडे जात असतांनाच मुख्य मार्गावरील आर.एस. बार पूर्वी त्या गाडी चे स्टेरिंग फ्री झाले. स्टेरिंग साथ देत नसल्याचे वाहन चालक प्रदीप शिरसाट यांच्या लक्षात आले त्यावेळी ते ब्रेक मारत असतानाच गाडी रस्त्याच्या कडेला उतरली आणि गाडी सरळ खाली उतरताच बस मध्ये कल्लोळ झाला. मात्र चालक प्रदीप शिरसाट हे ब्रेक वर उभे झाल्याने बस ही झाडा मुळे वाचली आणि मोठा अपघात टळला. या अपघात मध्ये २ ते ३ जण किरकोळ जखमी झाले. या अपघाताची माहिती सावली पोलिसांना देण्यातआली. घटनास्थळी ठाणेदार प्रदीप पुल्लरवार हे दाखल झाले.प्रवाशींना आपत्कालीन दरवाजा मधून बाहेर काढण्यात आले व तीन जखमी यांना पोलीस वाहनात सावली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. बस मध्ये २० ते २५ प्रवाशी होते मात्र बस चालकाच्या सतर्कतेणे मोठा अपघात होण्याचे टळले असेच सर्व जण म्हणू लागले. बस मधील सर्व प्रवाशी यांना दुसऱ्या बसने पाठविण्यात आले. घटनेची माहिती बस वाहक सुधीर बोरकर यांनी बस आगार प्रमुखांना दिली.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

एक प्रयत्न असाही....
ReplyDelete