ग्राहक जागृती सप्ताहात विद्यार्थी ग्राहक जागृती कार्यक्रम.

 ग्राहक जागृती सप्ताहात विद्यार्थी ग्राहक जागृती कार्यक्रम.

दुसऱ्या दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम.

मूल,दीपक देशपांडे 











ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६रोजीअस्तित्वात आल्यापासून ३८ वर्ष पूर्ण होत असताना अजूनही ग्राहकांना आपले हक्क आणि अधिकार यांची जाणिव नाही किंबहुना ग्राहकांची फसवणूक, लुबाडणूक आणि शोषण कमी होत नसून ते दिवसेंदिवस वाढतच आहे आणि फसवणुकीच्या प्रकारात वाढ होत असल्यामुळे तसेच ग्राहक हा असंघटित असल्यामुळे त्यांचे शोषण होत आहे परिणामी ग्राहक संघटन, ग्राहक जागृती आणि ग्राहक संरक्षण कायदा व त्याची व्याप्ती ह्याची माहिती होणे गरजेचे आहे परिणामी विद्यार्थी हा शाळेत शिक्षा म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी येत असतो आणि शिक्षक हे ज्ञानदानासाठी येत असतात त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही शाळांमधून राबवित असल्याचे व शोषणमुक्त  समाज निर्माण करण्यासाठी असे उपक्रम राबवत असल्याचे ग्राहक पंचायत च्या वतीने मार्गदर्शन करताना दीपक देशपांडे यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

तसेच उपस्थित मान्यवरांनी किराणा मालाच्या खरेदीपासून तर आँनलाईन फसवणूकीपर्यंत विद्यार्थ्यांना छोटेछोटे उदाहरण देऊन फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती दिली त्याला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

२४डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन  त्यानिमित्ताने दिनांक १७/१२/२०२४ रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूलच्या वतीने दिनांक १६डिसेंबर ते २५डिसेंबर२०२४पर्यंत ग्राहक जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्ताने मंगळवार दिनांक १७/१२/२०२४रोजी मूल शहरातील देवनिल कला कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थी ग्राहक जागृती सप्ताहाची सुरुवात केली गेली ,या कार्यक्रमात ग्राहक पंचायत मूल तालुका शाखेचे अध्यक्ष दीपक देशपांडे,हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तर, ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अशोक मैदमवार,सचिव रमेश डांगरे, आणि कार्यकारिणी सदस्य मुक्तेश्वर खोब्रागडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमात  महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक धिरज रामटेके व कु.पोर्णिमा लाटकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी ग्राहक गीत गायनाने केली. प्रास्ताविक ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष अशोक मैदमवार यांनी केले,तर संचालन आणि आभार प्रदर्शन धिरज रामटेके यांनी केले., कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सकारात्मक सहभाग घेतला.

तर.....

दुसऱा कार्यक्रम मूल तालुक्यातील टेकाडी येथील देवनिल विद्यालय टेकाडी येथे संपन्न झाला.


हा कार्यक्रम मुख्याध्यापक राजेश सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली दीपक देशपांडे, अध्यक्ष मूल तालुका ग्राहक पंचायत,यांचे प्रमुख मार्गदर्शनात , अशोक मैदमवार उपाध्यक्ष,रमेश डांगरे सचिव, तुळशीराम बांगरे संघटक, मुक्तेश्वर खोब्रागडे कार्यकारिणी सदस्य यांच्या  उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात समृद्धी नागोशे व सुकेशीनी दुधे यांनी ग्राहक गीत गायनाने केली. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना ग्राहक म्हणजे काय ,त्याची व्याख्या आणि फसवणूक प्रकार  व ग्राहक जागृती अभियानाची पार्श्वभूमी रमेश डांगरे सचिव ग्राहक पंचायत मूल यांनी ठेवली तर मार्गदर्शनात अशोक मैदमवार उपाध्यक्ष ग्राहक पंचायत मूल यांनी  ग्राहक म्हणजे काय आणि ग्राहक कायदा याबाबत माहिती दिली आणि  मुक्तेश्वर खोब्रागडे यांनी  शेतकरी ग्राहकांनी  बियाणे व खते खरेदी करताना कशी काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याध्यापक राजेश सावरकर यांनी ग्राहक पंचायत घ्या ह्या उपक्रमाचे कौतुक करीत ग्रामीण भागात फसवणूक व शोषणाचे अनेक प्रकार सतत होत असतात आणि अशा कार्यक्रमांमुळे आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होऊन जनजागृती व ग्राहक जागरुक तेचे मोठे कार्य पार पाडले जात असल्याने विद्यार्थ्यांनी आज मिळालेली माहिती आपल्या घरी जाऊन आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना द्यावी जेणेकरून आजच्या या आयोजनाचा उद्देश सफल होणार आहे आणि आमचे विद्यार्थी ही जागरुकता करण्यासाठी नक्कीच त्यांच्या पालकांना ही बाब सांगतील अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक, अंबादास राजणकर यांनी केले, आभार प्रदर्शन संदीप धाबेकर यांनी केले. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक, शिक्षीका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2m✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.