विद्यार्थ्याना संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज - डॉ.श्रेया व स्नेहल बोकारे
विद्यार्थ्याना संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज - डॉ.श्रेया व स्नेहल बोकारे
गे मायभू तुला सलाम!
विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी साधला संवाद
मूल , दीपक देशपांडे.
माणूस कितीही उंचावर गेला तरीही तो आपले आपल्या मातीशी असणारे नाते जर जपू शकला तर तो यशस्वी तर ठरतोच परंतू खऱ्या सन्मानाचा मानकरीही ठरु शकतो ,हे या कार्यक्रमाचे निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मुळ मूलचे सुपूत्र असणारे व आपल्या मेहनतीने सद्यस्थितीत मुंबईत राहून साऱ्या जगाला संगणक ज्ञान द्यायला तयार असणारे डॉ.श्रेया व स्नेहल बोकारे हे मूल शहरातील प्रसिद्ध डॉ.राममोहन बोकारे यांचे पुत्र व स्नुषा आहेत, व आजही आपल्या मातृभूमीला कवेत घेण्यासाठी झटताहेत.
भविष्यातील वेध घेणाऱ्या पिढीने संगणकाचे ज्ञान घेतल्याशिवाय समोरील वाटचाल शक्य होणार नसल्याने शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्याना संगणकाचे शिक्षण देणे काळाची गरज आहे. यासाठी पालकांनी सजग राहून संगणकाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा.विद्यार्थ्याच्या उन्नतीसाठी संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे मत भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मुंबई येथील सी. डेक. च्या सहसंचालिका डॉ. श्रेया बोकारे यांनी केले.
सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलच्या वतीने संगणक साहित्याचा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन बेंटली सिस्टीम मुंबईचे व्यवस्थापक असणारे स्नेहलकुमार बोकारे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष उच्च प्राथमिक शाळेचे अध्यक्ष नरसिंग गणवेंनवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार, उपाध्यक्ष सुखदेव चौथाले, शाळा व्यवस्थापक समितीच्या उपाध्यक्ष सुवर्णा पिपरे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष इंदू मडावी, समितीचे सदस्य रुपेश मारकवार, माजी सैनिक मारोती कोकाटे, उषा शेंडे, उषा थोराक, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी शाळेतील विद्यार्थी हे मध्यमवर्गीय पालकांचे दाखल असुन सर्वच विद्यार्थ्याना उत्तम शिक्षण देता यावे यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन शाळा करीत आहे. संगणकाची ओळख व्हावी यासाठी प्रयत्नरत आहेच. शाळेला मिळालेल्या संगणक साहित्याचा योग्य वापर करून विद्यार्थ्याना निपुण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी संगणकाचे शिक्षण सर्वांना आवश्यक असुन त्याशिवाय विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही. यासाठी नवीन सॉफ्टवेअर देण्याचे आश्वासन स्नेहलकुमार बोकारे यांनी देत ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील संगणकाचे ज्ञान घेवुन नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक बंडु अल्लीवार तर उपस्थितांचे आभार अजय राऊत यांनी मानले.यावेळी शाळेच्या सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्य व शिक्षकवृंद उपस्थित होते.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment