कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची चोवीसावी बैठक संपन्न
कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची चोवीसावी बैठक संपन्न
मूल १९: दीपक देशपांडे
कृषी महाविद्यालय, मूल अंतर्गत *चोवीसावी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक* दिनांक *१९ डिसेंबर,* २०२४ रोजी, ग्राम *भेजगांव* ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे *सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे,* शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष *श्री. विजय गुरनुले,* महाविद्यालयातील *विषयतज्ञ* , कृषि विभागाचे कृषि पर्यवेक्षक व सहाय्यक, तसेच यामंचाचे सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने *“उन्हाळी / दुबार धान पिकाचे नियोजन व रब्बी पिकांवरील कीड व रोग”* या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी शेतकर्यांनी उद्योजक म्हणून शेती करावी, आपल्या भागात वांगी, टमाटर घेतली जातात, पण वाटणा मेथी, कोथिंबीर, हे सुद्धा घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे उत्पादनात मोठी भर पडू शकते, कारण भाजीपाला हा मोठ्या प्रमाणात नागपूर व इतर ठिकाणांवरून येतो त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचे अभ्यास करून भाजीपाला पिकाची लागवड करावी. या भागामधे पाण्याची उपलब्धता असल्यामुळे उन्हाळी भूईमुंग टीएजी-२४ या वाणाची लागवड करावी, तसेच जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले. कृषि विद्यापीठ अकोला येथे अॅग्रोटेक-२०२४ चे आयोजन दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०२४ रोजी केलेले आहे. त्यामध्ये शेतकर्यांनी सहभागी व्हावे आणि इतर शेतकऱ्यांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन केले. विद्यापीठ प्रकाशित कृषिसंवादिनी व कृषिपात्रिकेबाबत सविस्तर माहिती याप्रसंगी देण्यात आली. महाविद्यालच्या उद्यानविद्या विषयतज्ञ *डॉ. अश्विनी गायधनी* यांनी भाजीपाला पिकावरील येणाऱ्या किड आणि रोगाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये कांदा पिकावर येणाऱ्या रोपवाटीकेतील मर रोगाकरीता, पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रती लिटर पाण्यात अर्धा ग्रॅम थायरम मिसळून जमिनीत झाडाच्या मुळाशी टाकावे. करपा रोग आल्यास कॉपर आक्सीक्लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. तसेच कोबीवर्गीय पिकांवर येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडींकारिता डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १३.० मि. ली. १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. तसेच करपा आढल्यास १५ ग्रॅम ताम्रयुक्त बुरशीनाशक १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे याबाबत सविस्तर माहिती दिली. कृषिविद्या विभाग विषयतज्ञ *प्रा. मोहिनी पुनसे* , यांनी गहू पिकांतील येणाऱ्या खत, तण, पाणी, कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये धान पिकावरील खोडकिडा व्यवस्थापनाकरिता पिकांची फेरपालट करणे गरजेचे असल्याचे सांगितले व सेंद्रिय पदार्थ जीवामृत, दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क कसे तयार करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. *प्रा. देवानंद कुसुंबे* कृषिविद्या विषयतज्ञ यांनी दुबार / उन्हाळी धान पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी लागवड तंत्रज्ञान जसे उन्हाळ्यामध्ये पाण्याचे, खताचे, कीड व रोगाचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी शेतीसंबंधी मंचाच्या सदस्यांनी उपस्थीत केलेल्या शेतीविषयक प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. मंचाच्या बैठकीनंतर श्री अरविंद शेंडे, भेजगांव यांच्या शेतावरील भाजीपाला पिकास भेट देऊन मार्गदर्शन केले. कृषि विभागाचे श्री पी. एन. पराते, व श्री. आर. एस. जाधव यांनी सुद्धा कृषि विभागाच्या विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास एकुण *३४ शेतकरी* व शास्त्रज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार *प्रा. मनीषा लवणकर* यांनी मानले.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment