लाडक्या बहिणींसाठी सुधीरभाऊंचा महामंत्र
लाडक्या बहिणींसाठी सुधीरभाऊंचा महामंत्र
महिलांची समृद्धी हाच सुधीरभाऊंचा ध्यास , त्यासाठी बहिणींचा एल्गार.
दीपक देशपांडे
सोमवारी सायंकाळी सहा वाजता विधानसभा २०२४च्या प्रचार तोफा थंडावल्या, परंतू त्यापूर्वी मूल शहरात भाजप महायुती चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ शहरातील लाडक्या भावासाठी त्यांच्या लाडक्या बहिणींनी स्वयंस्फूर्तीने काढलेल्या महारॅली ने विरोधकांच्या तोंडचं पाणी पळाले असून आजवर केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरलं की काय याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
हेल्पलाईन नंबर
महिला सुरक्षेचा मुद्दा अनेकदा ऐरणीवर येतो. बल्लारपूरच्या महिला सुरक्षित असल्या तरी कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि संकटसमयी तत्काळ मदत मिळावी, यासाठी सुधीरभाऊंनी महिला सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्याचे ठरवले आहे. अर्थात, त्यांचे वचन म्हणजे २०२५ मध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणीच.
पोलिसांत वाढवणार महिलाराज
स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यावर सुधीरभाऊ भर देणार आहेत. जेणेकरून घरे सांभाळणाऱ्या सक्षम महिला आता आपल्या परिसरावरही चांगले संस्कार करतील.
महिला उद्योजिका
बचत गटांच्या माध्यमातून आजवर महिलांसाठी रोजगारनिर्मिती झाली असली तरी आता उद्योग स्थापन करून महिलांना उद्योजिका बनवून संपूर्ण स्वावलंबी बनवण्याचा विडा सुधीरभाऊंनी उचलला आहे.
महिला बचत गटांसाठी मॉल्स
बचत गटांमार्फत निर्माण होणाऱ्या विविध उत्पादनांना आता आधुनिक बाजारपेठ (मॉल्स) मिळवून देण्याचा संकल्प सुधीरभाऊंनी केला आहे. त्यामुळे, महिलांची उत्पादनेही मॉल्समधून विक्रीसाठी उपलब्ध होतील.
आता लाडक्या बहिणींनी दाखविलेला विश्वास मतपेटीत बंदिस्त होऊन आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांना कोणती दिशा दाखविणार याबाबत विरोधक मंथन करीत आहेत.
नव्हें तो करावाच लागणार आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment