विद्यार्थ्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबियांची फसवणुकीपासून सुटका करण्यासाठी ग्राहकांच्या हक्काची माहिती घरापर्यंत न्यावी आणि जागृती करावी.:-नितीन घरोटे
सजग ग्राहक बनण्यासाठी सजग विद्यार्थी बनण्याची आवश्यकता:- मुख्याध्यापक नितीन घरोटे.
मूल, दीपक देशपांडे
विद्यार्थ्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबियांची फसवणुकीपासून सुटका करण्यासाठी ग्राहकांच्या हक्काची माहिती घराघरापर्यंत न्यावी आणि जागृती करावी ,असे उद्गार स्वामी विवेकानंद विद्या मंदिर मूलचे मुख्याध्यापक नितीन घरोटे यांनी काढलेत.
ग्राहक पंचायत मूल तालुका शाखेचे वतीने राबविण्यात येत असलेल्या विद्यार्थी ग्राहक जागृती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन नितीन घरोटे बोलत होते, तेव्हा या विद्यार्थी जागृती कार्याचे मनापासून कौतुक करीत त्यांच्या शाळेत हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.
१४०कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात ग्राहक हा नावापुरताच राजा असून पावलोपावली त्यांचे शोषण ,व फसवणूक केली जात असून तो सतत नाडवला जात आहे याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता ग्राहकांच्या हक्काप्रती जागरुक नसून त्या जनतेला ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६आणि सुधारीत ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९बाबत पूरते व जुजबी ज्ञान नसल्याने तो साध्या साध्या चुका करतो व आपल्या फसवणुकीचे कारण स्वतः च बनत असतो , त्यामुळे नव्या पिढितील विद्यार्थ्यांना ही माहिती घरापर्यंत पोहोचवून आपली आणि आपल्या कुटुंबियांची फसवणूक टाळावी लागणार आहे, यासाठी आम्ही हा उपक्रम शाळा, महाविद्यालयांतून राबवित असल्याचे, दीपक देशपांडे, अध्यक्ष मूल तालुका ग्राहक पंचायत मूल यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून स्पष्ट केले.
आम्ही ग्राहकाला राजा मानतो आणि ह्या राजाकडेच आज सिसिटिव्हीच्या माध्यमातून नजर ठेवून चोरांच्या नजरेने बघितले जात आहे त्यामुळे ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव करून देत त्यासाठी लढा देण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली.त्यासाठी सगळ्यांनी ग्राहकांचे हक्क आणि ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९मधिल तरतुदी समजून घेण्याची आवश्यकता पटवून दिली व त्याची सुरुवात म्हणून कोणतीही खरेदी केल्यानंतर पावती मागण्याची सुरुवात ही आपल्या सजग ग्राहक होण्याची पहिली पायरी असेल असे ठणकावून सांगितले. आणि ही सुरुवात विद्यार्थी दशेतून झाली तर भविष्यात आपली कुणी फसवणूक करु शकणार नाही यासाठी आम्ही हे अभियान राबवित असल्याचे स्पष्ट केले.
अशोक मैदमवार उपाध्यक्ष ग्राहक पंचायत यांनी प्रास्ताविक करताना ग्राहक, ग्राहक पंचायत आणि ग्राहक संरक्षण कायदा याबाबत माहिती दिली,तर रमेश डांगरे सचिव यांनी फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती दिली व ग्राहक म्हणून विद्यार्थी दशेतून जागरुक असण्याची आवश्यकता पटवून दिली.
कार्यक्रमाची सुरुवात सलोनी पिंपळकर व इतर २या शाळेतील विद्यार्थ्यांनींनी केलेल्या सुमधूर ग्राहक गीत गायनाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक राजेश संगेल यांनी केले , तर कार्यक्रमाची सांगता गीत गायनाने झाली, या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक -शिक्षिका , कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment