मूल तालुक्यातील धान खरेदीसाठी दोन नोंदणी केंद्र वाढवा
मूल तालुक्यातील धान खरेदीसाठी दोन नोंदणी केंद्र वाढवा
मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पणन अधिकारी यांना सूचना
दीपक देशपांडे मूल.
-मूल तालुक्यातील बाजार समितीच्या धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मुदत वाढवून दिली असली तरीही गर्दीमुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. अशात बेंबाळ व चिरोली गावांमध्ये दोन ऑनलाईन नोंदणी केंद्र वाढवून देण्यात यावे, अशा सूचना मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पणन अधिकारी यांना दिल्या आहेत.*
दोन ऑनलाईन नोंदणी केंद्र वाढविणे नितांत गरजचेचे असल्याची बाब मूलचे माजी पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार व भाजप नेते प्रवीण मोहुर्ले व त्यांच्या शिष्टमंडळांनी निदर्शनास आणून दिली होती. मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याची तातडीने दखल घेत अधिकाऱ्यांना ऑनलाइन नोंदणी केंद्र वाढवून देण्याच्या संदर्भात सूचना केल्या आहेत.
मूल बाजार समितीला एकच नोंदणी केंद्र आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणावर या नोंदणी केंद्रावर गर्दी करीत आहेत. अशात कुणीही धान बोनसच्या नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी, मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दोन आयडी सेंटर वाढवल्यास बेंबाळ व चिरोली परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मा.आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
मूल बाजार समिती मध्ये पीक नोंदणी सुरू झालेली आहे. मूल येथे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना येण्याचा त्रास कमी करण्यासाठी मूल तालुक्यात मूल व राजोली ठिकाणी केंद्र सुरू आहेत ,,बेंबाल, आणि सुशी दाबगाव अथवा चिरोली, या ठिकाणी केंद्र सुरू करावीत अशी मागणी मा.सुधीर भाऊंना करण्यात आलेली असून उद्या पासून बेंबाळ येथील केंद्र सुरू होणार असून सुशी दाबगाव साठी प्रयत्न सुरू आहेत अशी खात्रीलायक बातमी मूल कृउबास कार्यालयात भेट दिली असता पुढे आली आहे.
मान.आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात पणन अधिकारी यांचे समवेत एका विशेष बैठकीचे आयोजन केले असल्याचेही वृत्त आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment