राज्यात हेल्मेट सक्तीपूर्वी काही सुचना.

 महाब्रेकिंग:- राज्यात हेल्मेट सक्ती?

थोडं तुमचं थोडं आमचं.

दीपक देशपांडे 

अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय! दुचाकीवर मागे बसलेल्यासाठीही आता हेल्मेट सक्ती! तिसऱ्यांदा नियम मोडल्यास दंड भरावा लागेल, अन्यथा वाहन जप्त

आता दुचाकीवरील पुढे बसलेल्यासह मागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर देखील हेल्मेट बंधनकारक असणार आहे. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट आहे, पण मागच्या व्यक्तीकडे नसेल तरी एक हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक समितीने विशेषत: ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविली जाणार आहे. 

महाराष्ट्र राज्यात दुचाकी स्वार व सहप्रवासी या दोघांनाही दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे,म्हणजेच आता दुचाकी स्वारकास स्वतः सोबत दोन हेल्मेट सतत बाळगावे लागणार आहेत.अन्यथा दुचाकीवरून प्रवास करताना कुणी महत्वाचे कामासाठी पुढे जाणारा/जाणारी सहप्रवासी मिळाल्यास त्या प्रवाशांना लिफ्ट मागितली तरीही देता येणार नाही , नाहीतर किमान त्या प्रवाशांना कुणाला लिफ्ट मागायची असेल तर आपल्यासोबत एक हेल्मेट बाळगावे लागेल, म्हणजे परोपकार बंद अशी स्थिती येऊ घातली आहे.

कदाचित रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा उपाय सुचविण्यात आला असावा, हा निर्णय  योग्य नाही असे आमचे  मुळीच म्हणणे नाहीच परंतू असा हा निर्णय अंमलात आणण्या आधी आणि दोन  हेल्मेट सक्ती  करण्या अगोदर प्रशासनाने खालील उपाय करावेत असे सुचवावेसे वाटते.

सर्वप्रथम स्त्यावरील खड्डे बुजवावेत.

चौकात आणि  रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रिट फ्लेवर बॉक्स विटा दबून खड्डे पडले आहेत  वा रस्ते उंचसखल झालेले आहे ते दुरुस्त करावेत.

रस्त्यावरील अतिक्रमण दूर करावे.

फूट पाथ (पादचारी मार्ग)चालण्यास मोकळे करावेत.

प्रत्येक चौकात वाहतूक सिग्नल पादचारी जावे याकरीता १ मिनिट सर्व बाजूची वाहतूक थांबवावी.

प्रत्येक चौकात पोलीस वसुली करीता नसावे तर अनियमित वाहन चालकावर लक्ष देण्याकरिता असावेत .

गतिरोधक (रोड काँग्रेस च्या) नियमानुसार करावे.

गतिरोधक वर पांढरे पिवळे पट्टे असावेत.

रबरी गतिरोधक नियमात नाही ते तातडीने काढावे .

पुढें गतिरोधक आहे असे बोर्ड असावे.

गतिरोधक पुढे रेडियम स्टिकर लावण्यात यावे.

रस्त्याचे डीव्हायडर वर झाडे लावले आहेत ते U टर्न वर नसावेत.

अशी मागणी जनहितार्थ....दीपक देशपांडे ,मूल तालुका अध्यक्ष, ग्राहक पंचायत मूल. यांनी शासनाकडे केली आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.