नाईन्टिची विक्री ३५₹प्रमाणेच व्हावी.
नाईन्टिची विक्री ३५₹ प्रमाणेच व्हावी.जूनासुर्ला ग्रामस्थांची मागणी
दीपक देशपांडे
नानाविध कारणांनी मूल तालुक्यात चर्चेत असलेल्या जूनासुर्ला या गावातील काही युवकांनी मूल तालुका पत्रकार संघाचे पत्रकार भवनात पत्रपरिषदेत एक आगळीवेगळी मागणी केली.... निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने कदाचित ग्रामसभेचे आयोजन तातडीने करता येणार नसेल तर किमान ३५₹ची नाईन्टी ४०₹प्रमाणे विक्री करुन जनतेची लूट सुरू आहे,ती तातडीने थांबवावी.
ऐन निवडणुकीच्या काळात एकीकडे भेजगाव येथील दारु विक्री करणाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेशाची दोन्ही बाजूंनी चर्चा , आरोप प्रत्यारोप होत असताना जूनासुर्ला येथील युवकांची मागणी चर्चेचा विषय न ठरेल तरच नवलं.मग काय आहे ती मागणी.....
गंगाधर इंदूलवार आणि संदीप गिरडकर यांनी जूनासुर्ला येथील सरपंच रंजीत समर्थ यांना दि.९/११/२०२४ रोजी दिलेल्या एका निवेदनातून जूनासुर्ला येथील परवानाधारक देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्याची मागणी केली आहे.
पत्रपरिषदेत आपले मत व्यक्त करताना आयोजक म्हणतात, या निवेदनात त्यांनी गावातील तरुण मूले शाळकरी विद्यार्थी व गावातील नागरिक व्यसनाकडे आकर्षित होत असून गावकऱ्यांचे संसार उद्धवस्त होत असल्याचे कारण सांगितले आहे याशिवाय या दूकानाच्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा पाळल्या जात नसल्याचाही आरोप करण्यात आला ,सोबतच हे दूकान चिल्लर विक्रीचे दुकान असतांनाच येथूनच गडचिरोली जिल्ह्यात दारुचा पुरवठा केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला असून (९०मिली) दारुची बाटली (नाईन्टी) ज्याची छापील किंमत ३५₹असतांना ती ४०₹किंमतीला विक्री केली जात आहे ती तातडीने बंद करुन ती नमुद किंमतीत विक्री व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या पत्रपरिषदेला गंगाधर इंदूलवार, माजी युवासेना प्रमुख व पदाधिकारी शिवसेना(शिंदे गट),संदीप गिरडकर, खुशाल टेकाम ,माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, प्रशांत वनकर शाखा प्रमुख शिवसेना (उबाठा) व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याबाबत एक निवेदन ग्राहक पंचायत शाखा मूल कडे प्राप्त झाले,त्यावर प्रतिक्रिया देताना ग्राहक पंचायत मूलने, एक ग्राहक म्हणून प्रत्येक नागरिकाला कोणतीही वस्तू ही रास्त भावात आणि (एमआरपी) अधिकतम विक्री मुल्यापेक्षा जास्त रक्कम घेऊन विक्री करणे हा गुन्हा आहे याची जाणीव होणं ही एक अतिशय चांगली बाब आहे. आणि ग्राहक चळवळीत काम करत असताना झोपलेल्या प्रशासनाला जागे करायला आयताच विषय मिळणार ना? ग्राहकहितासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा व तातडीने कारवाई योग्य असा विषय आहे ,आणि हा ग्राहकांच्या फसवणुकीच्या अखत्यारीत येणारा विषय आहे ,सबब उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व छापील किंमतीपेक्षा अधिक रकम आकारणाऱ्या दूकानदारावर कारवाई करावी व असा प्रकार तालुक्यात अजून कुठे सुरू आहे याचीही चौकशी करावी व संबंधितांवर योग्य कारवाई करावी व ग्राहकांची फसवणूक टाळावी अशी मागणी मूल तालुका ग्राहक पंचायत च्या वतीने करण्यात आली आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2m✍️


Comments
Post a Comment