कोसंबी चा राडा,कोसंबी चे सरपंच, अन् उमेदवाराच्या विश्वासार्हतेला तडा ?
कोसंबी चा राडा,कोसंबी चे सरपंच, अन् उमेदवाराच्या विश्वासार्हतेला तडा ?
दीपक देशपांडे
दिनांक १८/११/२०२४रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४च्या प्रचाराची सांगता झाली, आणि प्रचार तोफा थंडावल्या.
यानंतर उमेदवार गृहभेटी घेऊन मतदारांना आपली बाजू पटवून देऊ शकतात मात्र त्यांना जाहीर सभा घेऊन, ध्वनीक्षेपक लावून प्रचार करता येत नाही, आणि जर असा प्रकार आढळल्यास त्याची तक्रार निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या फोन वर किंवा मोबाईल ॲपवरून करता येईल अशी व्यवस्था निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.
आणि याबाबत निवडणूक आयोगाने पत्रकार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच सभेत. स्पष्टपणे सांगितले होते.
मात्र अशा सभांना राजकीय प्रतिनिधी अनुपस्थित असतात आणि मग अर्धवट माहितीच्या आधारावर वेगळीच भूमिका घेत आम्हाला याबाबत माहिती नव्हती किंवा प्रशासकीय यंत्रणेवर आमचा विश्वास नसल्याने आम्ही समोरासमोर आलो वगैरे कारणमीमांसा......आणि मग परस्परांवर आरोप प्रत्यारोप होत असतात.
असाच काहीसा प्रकार ७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळाला.
मूल तालुक्यातील येरगाव येथे भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचाराची वेळ संपल्यावर गावात सभा घेतल्याचे व ती सभा हानून पाडण्यासाठी काॅंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार व काही जबाबदार पदाधिकारी तेथे पोहोचल्याचा आरोप दोन दिवसांपासून सुरू असून सुधीर मुनगंटीवार तेथून पळून गेल्याचा ही आरोप होत आहे.
त्यानंतर मूल तालुक्यातील कोसंबी या गावात रात्री उशिरा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार सभा घेत असल्याची बाब महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांना कळल्याचे व त्यामुळे ते ही सभा थांबविण्यासाठी कोसंबी गावात गेल्याचे व तेथे. गेल्यानंतर सुधीर मुनगंटीवार सभेत बोलत असल्याचे व त्यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करीत काॅंग्रेस पदाधिकारी यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.
वास्तविक पाहता काॅंग्रेस उमेदवाराला ही माहिती मिळताच त्यांनी ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध ॲपवरून दिली असती तर..... त्यांची कोसंबी गावात जाण्याची आणि कथीत मारहाण केल्याची तक्रार करण्याची व पर्यायाने आपल्यावरच संशयाची सुई रोखली जाण्याची वेळच आली नसती.
गावातील नागरिक व महिलांच्या बदललेल्या रुपाला घाबरून स्वतःचा बचाव करीत त्यांनाच तेथून पळून जाण्याचीही वेळ आली नसती आणि मग आपली चूक लक्षात आल्यावर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून तक्रार करीत कारवाई करण्याची मागणी करावी लागली नसती.
महिलांचा सुधीर मुनगंटीवार यांना मिळालेला पाठिंबा , कुठे लाडकी बहिण योजनेची यशस्वीता सिद्ध करीत आहे तर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती अधोरेखित केली गेली आहे, सर्वसामान्य जनतेला समजलेले हे शाश्वत सत्य आहे.
याही पलीकडे गावातील सरपंच गावात उपस्थित असतांनाच हा प्रकार घडला तेंव्हा एक जबाबदार व्यक्ती म्हणून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या या बैठकीची माहिती ते निवडणूक आयोग किंवा पोलिस यांचेकडे तक्रार करु शकले असते पण....?
उपलब्ध व्हिडिओत सरपंच हातावर हात ठेवून बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत असल्याने खरी संशयाची सुई त्यांचेकडे दिशानिर्देश करीत आहे आणि ग्रामस्थ या प्रकरणी त्यांनाच खरे दोषी मानत आहेत आणि त्यांच्या भुमिकेमुळेच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करीत आहेत.
निवडणुकीच्या एक दिवस आधी घडलेल्या या मध्यरात्रीच्या प्रसंगावरुन सरपंच आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विश्वासार्हतेला तडा गेला असून महायुतीच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रती सहानुभूती निर्माण झाली असून ही चर्चा दिवसभरातील वेगवेगळ्या घटना आणि , उलटसुलट प्रसिद्धी यांमुळे केवळ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्येच नव्हेतर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्र राज्यात सुद्धा परिणाम करणारीच ठरणार याबाबत दूमत नाही अशी चर्चा आहे.
अशा चर्चा सुरुच राहणार आहेत आणि आम्ही हे क्षण तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत. आता काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे ,या मतदानाचा निकाल शनिवारी लागणार आहे आणि तेंव्हा एक शाश्वत सत्य बाहेर येणार आहे ,जनतेचा कौल कोणाला आणि कां? तोपर्यंत.....आपल्या सहकार्याची अपेक्षा.
मतदान करणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण सगळे न चुकता बजावू या , चला चला मतदानाला जाऊ या.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment