आज जातीसाठी जात नाही तर परस्परांतील प्रेमभाव आणि त्या व्यक्तीचा स्वभाव महत्वाचा!

 आज जातीसाठी जात नाही तर परस्परांतील प्रेमभाव आणि त्या व्यक्तीचा स्वभाव महत्वाचा!

जनतेच्या दरबारातील जनमत.

दीपक देशपांडे 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये उमेदवारी मिळालेल्या  उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची सुरुवात झाली आणि जसजसे आपल्याला मिळणारे समर्थन आणि आपल्या प्रचाराची दशा आणि दिशा चुकीच्या दिशेने चालली आहे हे त्या उमेदवारांना लक्षात येऊ लागले तसतशी प्रचारात  जात ही महत्त्वाची ठरवून जातीचा मुद्दा उचलून कुणी बहुजनांच्या हक्कासाठी  हा लढा असल्याचे सांगितले आणि  बहुजनांचे हितरक्षक आपणच असल्याचे दाखवून त्या दृष्टीने प्रचाराचा अजेंडा ठरवला.

तर काही जणांना ही गोष्ट उशिरा लक्षात आली आणि आपण  हा मुद्दा जर घेतला नाही तर आपल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही हे कुणीतरी सुचविले आणि मग तोच मुद्दा लावून धरत आधीच कुणीतरी उचललेल्या या मुद्यावर निवडणूक प्रचारात खुलेआम वक्तव्य केले जाऊ लागले आणि दूर जाऊ बघणाऱ्या समाजाला आणि त्या जातीतील , समाजातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना हाताशी धरून या समाजाचा ,या नेत्यांचा पाठिंबा प्रकरणाची आणि मग त्या समाजातील नेत्यांची  या उमेदवारांना तर उद्या दूसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा,व पक्षप्रवेश यांची मालिका सुरू झाली आहे.

कालपरवा गावकुसातील कुण्या समाजातील एका पदाधिकाऱ्यांचे एका पक्षाला समर्थन जाहीर होताच त्या व्यक्तीच्या पक्षातून निलंबनाची कार्यवाही त्याच्यापेक्षा वरिष्ठ पदाधिकारी असल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी केले आणि उद्या दूसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याची घटना ताजी असताना यावरही मात करत त्याच समाजाचा (पक्षाचा) पुन्हा  एकदा तिसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याची घटना उघडकीस आली आणि आपणही समाजाचे काही देणे लागतो असा विचार करून आम्ही त्या समाजातील नेत्यांची मते जाणून घेतली तेव्हा असे लक्षात आले की,देणारा देतोय तर घेणाऱ्यांनी  घेत राहावे देणाऱ्याने देत राहावे,हा न्याय वापरून काही समाजातील हुशार लोकांनी या निवडणुकीतील उमेदवारांचे खिसे रिकामे केले आहेत , शेवटी तीन वेगवेगळ्या पक्षांना समर्थन जाहीर करणारे उद्या हे म्हणायला तर तयार असणारच आहेत  काय करता , त्यांनी आमचे ऐकलेच नाही , शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत चालले गेले........आहे कुणाजवळ काही उत्तर?

या पार्श्वभूमीवर आम्ही सध्या सुरू असलेल्या या  ज्वलंत  प्रश्नांवर वेगवेगळ्या जाती , धर्मातील , वेगवेगळ्या स्तरांतील  लोकांना याबाबत प्रश्न केला की तुमचे समर्थन कुणाला? तुमच्या जातीचे समर्थन कुणाला? तुमच्या समाजाचे समर्थन कुणाला?

कुणी प्रामाणिकपणे जातीच्या पुढाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मतदान करु असे स्पष्ट केले तर कुणी, विचार करु म्हणत विषय टाळला तर बहुतांश जणांनी  आज जातीसाठी जात नाही तर परस्परांतील प्रेमभाव आणि त्या व्यक्तीचा स्वभाव महत्वाचा! असल्याचे स्पष्ट केले आणि आजच्या जमान्यात कोण जातीधर्माच्या विळख्यात अडकून पडला आहे , खरेतर आता शासनस्तरावर जात विचारणे बंद करुन आर्थिक निकषांवर जात ठरवण्याची गरज आली आहे असे परखड मतही व्यक्त केले.

हा विषय पुढे आलाच म्हणून आम्ही दूसरा प्रश्न उपस्थित केला, आरक्षणाच्या प्रश्नावर आपले काय मत आहे , याबाबत सगळ्यात जास्त आक्षेप घेतला गेला तो ओबीसी समाजातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतांना तो प्रकर्षाने जाणवला, आणि तो एकदम गरीबी रेषेखालील कुटुंबातील सदस्यांनी नाही तर सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि नौकरदार वर्गातील लोकांनी तो प्रामुख्याने मांडला आणि शासनाच्या ८५%जनतेसाठी ५०%आरक्षणाचा विरोध केला व जातीनिहाय जनगणना व जनगणनेच्या प्रमाणात आर‌क्षणाची मागणी पुढे करण्यात आली,कारण काय तर म्हणे आमच्या पोराबाळांना शासकीय नौकरी मिळत नाही , आणि.....

याचवेळी एससी ,एसटी, एनटी, आदिवासी व विमुक्त जाती धर्मातील लोकांना मात्र आता हे आरक्षण काही प्रमाणात नकोसे झाल्याची बाबही पुढे आली.

एकूणच काय तर .... शासकीय स्तरावर नौकरी मिळवून सुखवस्तू जीवन जगण्यासाठी आरक्षणाच्या कुबड्या घेऊन वावरण्यासाठी बहुतांश समाजातील लोक अजूनही प्रयत्न करताहेत परंतू एवढ्या वर्षात ज्यांना हा लाभ मिळालाच नाही त्यांना तो मिळवून देण्यासाठी मात्र फारच थोडे लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप गावकुसातील लोक करीत असून आमच्याच समाजातील सुशिक्षित लोकच आमच्या प्रगतीत बाधक ठरत असल्याचा प्रत्यय या मतदारसंघात गोरगरीब जनतेच्या मनातील भाव भावना समजून घेताना आम्ही अनुभवला आणि.....

आज जातीधर्माच्या नावावर कुणीही कुणालाच अडकवून ठेवू शकत नाहीत,तर प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे विचार करून आपल्या मूलाबाळांच्या, भविष्यासाठी ,यशासाठी, आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या उमेदवारांना मतदान करुन आपल्या यशासाठी, प्रगतीसाठी आणि  लोककल्याणासाठी निवडून देतील हा विश्वास  आम्ही ७२ ,मूल- - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनुभवला, तो प्रामाणिकपणे तुमच्यासाठी इथे व्यक्त करताना आनंद होतो आहे.

बघा,उघडा डोळे, विचार करा आणि जाणिवपूर्वक योग्य उमेदवाराला मतदान करा.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक           ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.