आज प्रचार तोफा थंडावणार!

 अखेर आज प्रचार तोफा थंडावणार!

७२,मूल- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ 

दीपक देशपांडे 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ साठी बुधवार दिनांक २०/११/२०२४ रौजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली असून त्यासाठी प्रशासनाने सगळी व्यवस्था पूर्ण केली असून उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या विचारांची साखरपेरणी करण्यासाठी उमेदवारांनी शक्यतो सर्व प्रयत्न करीत विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करीत आपलीच बाजू सत्याची आहे हे पटवून देण्यासाठी ,साम,दाम , दंड भेद या साऱ्या प्रकारांचा वापर केला.

मूल-बल्लारपूर मतदारसंघात एकुण २०उमेदवार निवडणुकीच्या समरांगणात आपल्या भाग्याची परीक्षा देत असून प्रत्येकानी आपल्या कुवतीनुसार प्रचार मोहीम राबवली आहे, आणि आज त्या मोहीमेला सायंकाळी सहा वाजता पूर्णविराम मिळणार आणि या प्रचार तोफा थंडावणार आहेत , ध्वनीक्षेपक थंडावणार आहेत.

उद्या उमेदवार  मतदारांच्या गृहभेटी घेऊन आपली बाजू पटवून देण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न करणार आहेत,मात्र हा दिवस सगळ्यांसाठी फार महत्वाचा ठरणार असून प्रत्येक जण डोळ्यात अंजन घालून असणार आहेत.

तिकडे प्रशासन उद्या निवडणुकीसाठी मतदान कर्मचारी आणि मतपेट्या ( ईव्हीएम) मतदान केंद्रावर पाठवण्यासाठी पूर्ण तयारीत आहेत, त्यासाठी ईव्हीएम ,व्हीव्हीपॅट व मतदानसाहीत्य व कर्मचारी यांच्या रवानगी साठी तत्पर झाले आहेत, त्यासाठी आजपासूनच वेगवेगळ्या गाड्या प्रशासकीय भवन परिसरात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.प्रशासकीय भवन लोकशाहीच्या या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे.

उमेदवार,उमेदवाराचे मतदानकेंद्राचे प्रतिनिधी यांचे ओळखपत्र तयार झाले आहेत ,कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चला तर मग....२०उमेदवारांचे भाग्य.   ३लाख १२ हजारांवर मतदार या उमेदवारांच्या भाग्याचा निकाल लावून आपल्या मनातील उमेदवाराला मुंबई येथील महाराष्ट्र शासनाचे कार्यप्रणालीत आपले मत मांडणारा प्रतिनिधी निवडून पाठवणार आहेत.

लोकशाहीच्या या पर्वाचे आनंदाने स्वागत करु या.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.      ✍️Ddbatmi@m2m✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.