हा झंझावात काॉंग्रेसच्या उमेदवाराला किती भारी पडणार?
हा झंझावात काॉंग्रेसच्या उमेदवाराला किती भारी पडणार?
दीपक देशपांडे
०५ नोव्हेंबर ला डॉ. अभिलाषा यांनी मूल शहरामध्ये विविध ठिकाणी भेटी दिल्या तसेच लोकांकडून प्रेम व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला....! अशा आशयाची एकपोस्ट समाजमाध्यमांवर वायरल केली जात आहे .
...तर, राकेश गावतूरे यांनी डॉ अभिलाषा गावतूरे यांचा फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले आहे, त्यावरुन कुणितरी विरोधक जाणिवपूर्वक तर असे प्रकार घडवून आणत नाहीत ना?अशी शंका निर्माण झाली आहे.यासाठी थोडे मागे वळून बघावे लागेल. एक
लोकसभा निवडणुकीत आपल्या अथक प्रयत्नातून समाजमन जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि आजच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल ही आशा आणि खात्री बाळगणाऱ्या अभिलाषा गावतूरे यांना आपल्या उमेदवारी मिळण्याच्या आशेवर संतोष रावत यांनी कुरघोडी करीत पाणी फेरल्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत असून आज त्या मतदारांपुढे हात जोडून सहकार्य करण्याची विनंती करीत दारोदार फिरत आहेत.
पक्ष आणि कार्यकर्ते यांचा कुठलाही पाठिंबा नसताना त्यांनी घेतलेली ही भूमिका जरी वाखाणण्याजोगी असली तरीही अपुरे मनुष्यबळ आणि कार्यकर्त्यांची वाणवा त्यांना इच्छित यशापासून दूर ठेवत आहे,हे कुणी नाकारू शकत नाही, मात्र त्यांची उमेदवारी आणि प्रचाराची तऱ्हा इतर कुठल्याही उमेदवारापेक्षा काॅंग्रेसला भारी पडणार याची प्रचिती यायला सुरुवात झाली आहे.
अभिलाषा गावतूरे यांनी मागील काही दिवसांत समाजातील घटकांसाठी दिलेला लढा भुमीपुत्र ब्रिगेड ची स्थापना आणि संघटन मजबूत करण्यासाठी केलेली धडपड त्यानंतर काॅंग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश आणि सततचे कार्य हे सगळे करुनही काॅंग्रेसने दाखवलेला बाहेरचा रस्ता आता मात्र काॅंग्रेसला व काॅंग्रेस. उमेदवाराला भारी पडणार असून त्यासाठी अभिलाषा गावतुरे जिवाचे रान करीत आहेत.
जनतेच्या दरबारात आम्ही कानोसा घेतला असता अधिकतम लोकांनी तुलनात्मक दृष्ट्या संतोष रावत यांचे पेक्षा अभिलाषा गावतूरे यांना अधिक मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरण त्यांचेवर उलटून त्यांना मागे खेचणार आहे तर याबाबत अभिलाषा गावतूरे या कोणत्याही भ्रष्टाचार प्रकरणी गुंतलेल्या नसल्याने त्यांची बाजू भरभक्कम असल्याचे बोलल्या जात आहे. शेवटी त्यांचा मुकाबला हा महायुती व भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत होणार आहे हे विसरता येणार नाही.
आजच्या मोर्चात सहभागी जनसमुदाय मात्र अभिलाषा गावतूरे यांना आपल्या भावी आमदार मानू लागल्याचे दिसत होते,ह्याचीही दखल सगळ्याच उमेदवारांना निश्चित घ्यावी लागणार आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक ✍ Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment