अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने तीन दिवस बंद ठेवावीत, मुख्याधिकारी,न.प.मूल.

 प्रशासकीय भवन परिसरातील अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने तीन दिवस बंद ठेवावीत, मुख्याधिकारी,न.प.मूल.

दीपक देशपांडे मूल 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय भवन मूल समोरील दुकाने दि. १८/११/२०२४ ते दि. २०/११/२०२४ पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे पत्र.

 संदर्भ :- :- १. निवडणुक निर्णय अधिकारी ७२ -बल्लारपूर विधानसभा मतदार संघ, तथा उपविभागीय अधिकारी, मूल यांचे पत्र क्र. कावि/निवड/वि.स.स./२०२४/632 दि. ११/११/२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास सुचित करण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चे ७२-बल्लारपूर विधानसभा मतदार दिनांक २०/११/२०२४ रोजी होणार आहे. प्रशासकीय भवन मूल समोरील रोडवर मतदान पथकांची वाहने मूल ते चंद्रपूर रोडवर उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे दि. १९/११/२०२४ व २०/११/२०२४रोजी निवडणुकीचे मतदानाचे कामासाठी शासकीय व खाजगी वाहने घेण्यात आलेली आहे. प्रशासकीय भवन समोरील मूल ते चंद्रपूर मार्गावर बरेच किरकोळ विक्रेते अनाधिकृत अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केले असल्याने सदर दुकानासमोर इतर नागरीकांचे वाहने व नागरीक उभे राहण्याची शक्यता आहे.
तसेच निवडणुक मतदान पथकाची क्षेत्रीय अधिकारी यांची वाहने दिनांक १८/११/२०२४
  पासून अधिग्रहित केले आहे. तसेच दि. १९/११/२०२४ रोजी मतदान पथकाकरिता येणारे बस, मिनी बस, जिप ,मूल ते चंद्रपूर मार्गावर वाहणे उभी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या दुकानासमोरील रहदारी/वरदळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय भवन मूल समोरील अनधिकृत असलेली दोन्ही बाजुचे दुकाने दिनांक १८/११/२०२४ ते २०/११/२०२४ पर्यंत बंद ठेवावे..
तसे न केल्यास आपणास कोणतीही पुर्व सुचना न देता सदर अतिक्रमणीत दुकाने नगर परिषद कार्यालय तर्फे हटविण्यात येतील. तसेच महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९, १८०, १८१ मधील तरतुदीतील नियमानूसार कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असे
मुख्याधिकारी नगर परिषद मूल यांनी कळविले आहे.
सदरहू सुचनापत्राची
प्रत- १. निवडणुक निर्णय अधिकारी ७२ – बल्लारपूर विधानसभा मतदार संघ, तथा उपविभागीय अधिकारी, मूल यांना
माहितीस सादर.
२. मा. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मूल यांना माहितीस सादर.
स्वा – मुख्याधिकारी नगर परिषद मूल
या आदेशामुळे दैनंदिन व्यवहार चालविणारे अतिक्रमण धारक काहीसे दुखावले जाऊं शकतात परंतू त्यांनी लोकशाही च्या या उत्सवात शासकीय आदेशाचे कुणी उल्लंघन करुन कठोर कार्यवाही करण्यास बाध्य करुन नये असे आवाहन संदीप  थोडे मुख्याधिकारी नगर परिषद मूल यांनी केले आहे .
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.             ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.