मूल-बल्लारपुरात सुधीर मुनगंटीवारांचे पारडे जड; !

मूल-बल्लारपुरात सुधीर  मुनगंटीवारांचे पारडे जड!

दीपक देशपांडे 

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजप-महायुतीचे उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार रिंगणात आहेत. तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून संतोषसिंग रावत आणि पूर्वाश्रमीच्या  सामाजिक आणि काही महिन्यांपूर्वी  काॅंग्रेसच्या दावणीला  बांधून आपली राजकीय पोळी शेकण्र्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यां  आणि अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे मैदानात आहेत. एकीकडे सलग तीन विजय मिळविणारे आणि विकासपुरुष म्हणून  ओळखले जाणारे बलाढ्य मुनगंटीवार आणि दुसरीकडे विधानसभेच्या रिंगणातील नवीन नेते, अशी ही लढत आहे. महाराष्ट्रात तीनवेळा भाजप सत्तेत आले आणि मुनगंटीवार तिन्ही वेळा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री राहिले. त्यांच्याविरोधात लढणाऱ्या दोन्ही उमेदवारांना केवळ संस्था-संघटनांच्या पलीकडे पदं मिळवता आली नाहीत , आणि मिळालीत तीही वादाच्या भोवऱ्यात सापडली.

अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसची परंपरागत मते त्यांना मिळतीलच असे नाही , यांशिवाय  जूने काॅंग्रेसी प्रकाश पाटील पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत ते काही ना काही काॅंग्रेसी मते आपल्या  पदरात पाडून घेण्यासाठी धडपडणारच हे स्पष्ट आहे ,पण तिथेही घरातूनच  विरोध आहे पण गेल्या वर्षभरापासून काँग्रेसमध्ये काम केल्यामुळे काही अंशी काँग्रेसची मतं आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरू, असे या दोघांनाही  वाटत आहे. या निवडणुकीत लोकसभेप्रमाणे जात हा मुद्दा राहणार नाही असे वाटत असतानाच तोच मुद्दा काही प्रमाणात प्रभावी करण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे, बाकी अपक्ष उमेदवार आपापल्या परीने मत गोळा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यामुळेच विरोधकांची अडचण होत आहे. आणि  म्हणूनच  काहीही केले तरी निवडणुकीत जात हा मुद्दा लावून धरण्याचा आणि  तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 

काँग्रेसची काही मते अभिलाषा गावतुरे आपल्याकडे वळवतील तर काही मते प्रकाश पाटील, असे राजकीय जाणकार सांगतात ,त्यामुळे याचा फटका काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंग रावत यांनाच बसेल, हे स्पष्ट आहे. 

नव मतदार विकासाच्या व्हिजनसोबत

मतदारसंघात भाजपचे परंपरागत मतदार आहेत,ही मते भाजप महायुतीचे उमेदवार मुनगंटीवार यांना  मिळणारच आहेत ,सोबतच महा युतीमुळे  राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गट यांची मते यांची यात भर पडणार असून या व्यतिरिक्त नव्याने जुळलेला युवा मतदार विकासाच्या व्हिजनमुळे मुनगंटीवार यांच्यासोबत आहे. गावतुरे आणि रावत यांच्यात जी लढाई आहे, ती दुसऱ्या क्रमांकासाठी असणार आहे, हे स्पष्ट आहे. याचे कारण मतदारसंघात झालेल्या विकासकामांमध्ये दडलेले आहे , त्यामुळे रस्ते, नाल्या बांधकाम व इमारती बांधकाम म्हणजे विकास आहे का?असा प्रश्न उपस्थित करून जनतेला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हे काम मुनगंटीवारच करू शकतात,हा विश्वास.

 खरेतर आजपर्यंत सुधीर मुनगंटीवार  यांनी केलेली विकासकामे विरोधकांनाही मान्य होती आणि हा विश्वास की ही कामे दुसरा कुणीच करु शकला नसता पण विरोधात उभे टाकायचे तर मुद्दा हवा ना? म्हणून .....पण या मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांना १५ वर्षे कामाचा अनुभव आहे. त्यापूर्वी १५ वर्ष ते चंद्रपूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. सत्ता नसतानाही त्यांनी कामे कशी खेचून आणली, हे चंद्रपूर -बल्लारपूर मतदारसंघातील लोक आजही आवर्जून सांगतात. त्यांच्या अनुभवाचा आणि राज्यातील वजनाचा पुरेपूर फायदा येत्या ५ वर्षांत मतदारसंघाला होणार आहे. विकासनिधी असो, उद्योग असो, पायाभूत सुविधा, सिंचन, कृषी, पर्यटन असो किंवा रोजगार असो.. हे काम मुनगंटीवारच करू शकतात, याची पूर्ण जाणीव व विश्वास  मतदारांना आहे. 

समस्या सोडवण्याची क्षमता

२०१४ ते २०१९ या काळात मुनगंटीवार अर्थमंत्रीसुद्धा राहीलेले आहे. हा दांडगा अनुभव त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीची चावी जिल्ह्याच्या दिशेने कशी फिरवायची, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. 'त्या तिजोरीचा पासवर्ड अजूनही माझ्याकडे आहे', असे ते नेहमी सांगत असतात. त्यामुळे मुनगंटीवार पुन्हा आमदार झाल्यास शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न आदी राहिलेली काही कामे ते निश्चितपणे पूर्ण करतील, असा विश्वास मतदारसंघातील जनतेला आहे. अशा एकूणच परिस्थितीत बल्लारपूरच्या विकासाचे शत्रू म्हणून उभे ठाकलेले 'भल्लालदेव' यांच्याकडे चाचपडण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, असेच चित्र आहे.

भल्लालदेव म्हणजे नेमके कोण?

बाहुबली चित्रपटात भल्लालदेव हा मुख्य खलनायक असतो. पण तो बाहुबलीच्या तुलनेत शक्तीमध्ये पडतो. बाहुबलीपुढे मोठं आव्हान उभं करण्यात भल्लालदेवला थोडंफार यश येतंही. पण अखेर विजय बाहुबलीचाच होतो. हे उदाहरण माहिती असल्यामुळे अख्ख्या चंद्रपूरचे ‘बाहुबली’ सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे बल्लारपूरच्या विकासाचे शत्रू म्हणून उभे असलेल्या ‘भल्लालदेवां’चा टिकाव कसा लागेल, असा प्रश्न मतदारांनाच पडला आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील एकतर्फी लढतीत रावत आणि गावतुरे यांची तारेवरची कसरत होत आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.