निवडणूक आखाडा:-घरका भेदी लंका ढाए!

निवडणूक आखाडा:-घरका भेदी लंका ढाए!अजून एक पत्र!!

दीपक देशपांडे 

निवडणूक आखाड्यात कधी काय होईल याचा अंदाज कुणालाही लावता येत नाही,हे म्हणतात ते बिलकुलच खोटे नाही. कारण तो आखाडाच मुळात प्रश्न आणि उत्तरांचा आहे, आरोप आणि प्रत्यारोपांचा आहे ,सत्याची आहुती देऊन असत्याच्या विजयाची नांदी आहे,तर कधी असत्यावर विजयाची पताका फडकवत ठेवण्याची कला आणि संस्कृती रक्षणाचा पाया आहे. म्हणूनच....

कालपरवा काॅंग्रेसच्या वतीने एक पत्र अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतूरे यांना संबोधून वायरल केले गेले होते त्याचे प्रत्युत्तर आज अभिलाषा गावतूरे यांचे वतीने सडेतोड पणे दिल्या गेले आहे.

हा वाद -संवाद बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात एक नवीन चैतन्य आणि प्रचारासाठी समाज माध्यमांचा वापर यावर चिंतन करणारा ठरणार की काय?अशी शंकाही निर्माण करुन जाणार आहे.

काय आहे या पत्रात हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असणार आहे,बघा...

 प्रति,

 *संतोष* *सिंग* *जी* *रावत* 

विषय: *बल्लारपूर विधानसभेकरीता भरलेला उमेदवारी फॉर्म मागे घेण्याबाबत.*

बल्लारपूर विधानसभेतील मतदारांना वाटते की, आपण बल्लारपूर विधानसभेकरिता भरलेला  लढण्याचा फॉर्म तात्काळ मागे घेतला पाहजे. कारण, महाविकास आघाडीची तिकीट वर हक्क डॉ अभिलाषा गावतुरे मॅडम यांचाच होता. पण भारतीय जनता पक्षाच्या सुधीर भाऊंना काट्याची टक्कर देणार आहे आणि भाऊंचा पराभव हा निश्चित होता म्हणून त्यांची तिकीट कापला गेली.  आणि मुनगंटीवारला जिकून आणण्यासाठी तुम्हाला उभे केले गेले . तुम्ही डमी आहात. प्रत्येकाच्या ओठावर अभिलाषा  ताईचे नाव आहे. त्यांच्या मनामनात ताई आहे .  कोरोनाकाळात जीवाची परवा न करता शेकडो लोकांना मोफत आरोग्य सेवा देणारी ताई , शेतकरी कष्टकरी समाजाच्या सर्व प्रश्नांना वाचा फोडणारी ताई,  हिस्त्र प्राण्याचे सतत होणारे हल्ले यावर बोलणारी ताई,एखाद्या  जंगलाच्या ठिकाणी मुलांसाठी बसेस ती सोय आहे नसल्यास आगारावर हल्लाबोल करणारी ताई ,मुलांना ऑटो रिक्षा करून  देऊन त्यांची शाळा बुडू  नये याची काळजी करणारी ताई ,गोरगरिबांच्या मदतीला नेहमीच धावून  जाणारी ताई ,पुरामध्ये खचलेले घर सावरणारी ताई ,ओबीसीचा महाआंदोलन तयार करून भारतात ओबीसी या विषयाला वाचा फोडणारी ताई , वाचनालय सुरू करून घराघरातून अधिकारी निर्माण व्हायला पाहिजे अशी स्वप्न बघणारी ताई, कंत्राटीकरणाच्या विरोधात बोलणारी ताई , विद्यार्थ्यांना हॉस्टेल  म्हणून स्वतःचं घर खुल करून देणारी ताई , नेहमीच संपूर्ण बहुजन समाजाच्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावर जिंदाबाद मुर्दाबाद करणारी ताई आहे म्हणून  सर्व कार्यकर्ते व  जनता पूर्ण ताकदीने काम करायला तैयार झाली आहे. त्यामुळे, आता *मा. संतोष भाऊ रावत* आपण  नाराज न होता आपल्या सर्वांना ताईसाठी  काम करायचे आहे. कारण तुमच्याकडे काँग्रेसची तिकीट असताना सुद्धा उमेदवार शर्यतीत टिकणार तुम्ही  नाही. फक्त मतांचे विभाजन होणार आणि त्याचा फायदा फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाला होणार. आपल्या सर्वांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे *कुठल्याही परिस्थितीत शेतकरी विरोधी महाराष्ट्राचं वाटोळं करणार सरकार परत सत्तेत येता कामा नये.*

ताईच विधानसभेत जाऊन सर्व सामान्य जनतेला न्याय देऊ शकते.

भाऊ तुम्हाला भविष्यात संधी मिळेल .त्यामुळे आपण चूक करणार नाही असं बल्लारपूर विधानसभेतील जनतेला वाटते. आपण 2-4 लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. 

ताई जरी अपक्ष असल्या तरी जनता संपूर्ण जनता हे त्यांची पक्ष झालेली आहे. *लोकसभेत बाईने पाडलं आणि आता विधानसभेतही बाईच पाडेल* हे वाक्य प्रत्येकाच्या मनात आणि ओठावर आहे.

यामुळे, आपण भरलेला फॉर्म मागे घेऊन मुनगंटीवार यांना पाडण्याच्या मोहिमेमध्ये महाविकास आघाडी सोबत सक्रियतेनी सहभागी व्हाल अशी सर्वांची इच्छा आहे. आपल्या योग्य निर्णयाच्या अपेक्षेत संपूर्ण मतदार.

आपले शुभचिंतक,

*बल्लारपूर विधानसभेतील मतदार*

आपल्याला काय वाटतंय?अशा पत्रप्रपंचावरुन जनतेला दिलासा मिळेल?की....... आज आता नामांकन पत्र परत घेण्याची वेळही संपून गेली असून दोघेही दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात पाय रोवून उभे राहिले आहे ,तर तिकडे प्रकाश पाटील मारकवार सुद्धा मैदान सोडायला तयार नाहीत मात्र संदीप गिऱ्हे यांनी वरिष्ठांचा आदेश मान्य करीत आपले नामांकन परत घेतले आहे. आज शेवटी एकुण २७ नामांकनापैकी ७ नामांकनपत्र परत घेतल्याने अजूनही २०उमेदवार मैदानात आहेत ,म्हणजे ह्या समरांगणात तुल्यबळ लढत आणि  आरोप-प्रत्यारोप होणारच आहेत आणि ही निवडणूक आपसुकच लक्षात ठेवावी अशीच असणार आहे.

आम्ही तुमच्यासाठी असे छोटे छोटे क्षण संकलीत करुन घेऊन येणारच आहोत तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाची तयारी करुन ठेवा,माझे मत.....!


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक

     ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.