मतदान संथगतीने... पहिल्या दोन तासात दोन अंकी टक्केवारी गाठू शकली नाही.

 मतदान संथगतीने सुरू... पहिल्या दोन तासात दोन अंकी टक्केवारी गाठू शकली नाही.



दीपक देशपांडे 

सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला मात्र वाढलेली थंडी आणि एकुणच ढवळलेल्या राजकीयपरिस्थितीमुळे की काय मतदानाची टक्केवारी अल्प असल्याचे प्राप्त माहितीनुसार कळते.

मूल -बल्लारपूर मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत संपलेल्या  दोन तासात मतदानाची टक्केवारी दोन अंकात पोहोचू शकली नाही ,ही काही प्रमाणात चिंताजनक बाब असल्याचे मत काही राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

नऊ वाजता संपलेल्या दोन तासात मतदारसंघात ३लाख १२हजारावर मतदारांपैकी केवळ२७५३५मतदारांनी आपला मताधिकार वापरला असून त्याची टक्केवारी ८.८२%इतकी आहे, हळूहळू मतदान केंद्रावर गर्दी वाढत असल्याचे वृत्त हाती येत आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.