आज ईव्हीएम व्हिव्हीपॅट आणि मतमोजणीतून उलगडणार भाग्य?
आजच्या मतमोजणी नंतर सुरु होणार.....?

दीपक देशपांडे
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आजच्या मतमोजणी नंतर खऱ्या अर्थाने सुरू होणार असून या सत्तासंघर्षात साम, दाम, दंड, भेद, या आयुधांचा मुक्तपणे वापर करणाऱ्यांच्या भाग्याचा हिशेब मतदारांनीकेलेल्या विक्रमी मतदानाचा लेखाजोखा समोर येईल तेव्हा आपल्याला कळेलच.
यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या मुद्द्यांवर निवडणूक प्रक्रिया राबविली गेली होती,ज्याचा थेट परिणाम मतदारांवर आणि त्याचा नफातोटा उमेदवारांना अवघ्या काही तासांतच आपल्यासमोर येणार आहे.
मागे जाणारा प्रत्येक क्षण कुणाला यशाच्या शिखरावर पोहोचवत आहे तर कुणाला शिखरावरुन कडेलोट करण्यासाठी धडपडत आहे. आणि आपण सगळेच त्या क्षणाला मनात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत ,उत्कंठा वाढली आहे, धडधडही वाढत आहे , निकाल लवकरात लवकर यावा अशी प्रत्येकाची मनापासून इच्छा आहे.
*कर भला तो हो भला* ह्याची प्रचिती येणार आहे, परंतू आधी या निवडणुकीत नेमकं काय घडलं? आणि कोणते मुद्दे प्रभावी ठरलेत यांची गोळाबेरीज केलीतर सत्ताधारी गटाला लाडकी बहिण , ही योजना सगळ्यात प्रभावी ठरल्याचे दिसून येते,त्यावर विरोधकांनी दिलेला दरमहा ३०००₹. देण्याची घोषणा हा पर्याय केवळ पोकळ घोषणा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही,कारण आजवरचा इतिहास आणि अनुभव सांगतो की निवडणूक पूर्व घोषणा कधी कधीच पूर्णत्वास जाते ,मात्र सत्ताधारी गटाने त्याची अंमलबजावणी करुन विश्वास संपादन केला आहे.
शेतकरी हितासाठी वीज बिलाची माफी आणि पाच वर्षे मोफत वीज देण्याची घोषणा करुन केलेली त्याची अंमलबजावणी सत्ताधारी गटाला विशेष लाभप्रद ठरणार असून विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी प्रत्यक्षात मिळालेल्या लाभापेक्षा घोषणेवर विश्वास ठेवायला जनमत तयार नाही ,हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ शकते.
ग्रामस्थांना मिळालेले रस्ते,सिंचनाची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, शेतमालाला बोनस , शेतकरी सन्मान योजनेचा लाभ , घरकुल योजना, सहज पतपुरवठा ,१₹त विम्याचा लाभ , दृष्य अदृश्य कितीतरी योजना मतदारांच्या मनात घर करून गेल्या आहेत ,मात्र विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करण्याची घेतलेली भूमिका त्यांना यशापासून दूर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत होती,मात्र विरोधकांनी आपली दिशा बदलली नाही आणि विरोधाची धार मात्र बोथट करुन ठेवली, आणि महागाई, बेरोजगारी,व अशक्य कोटीतील घोषणा करुन जनमत आकर्षित करण्याचा प्रयत्न केला,तो निश्चितच जनता धुडकावून लावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, आणि शाश्वत सत्य विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे,त्याचा परिणाम येणाऱ्या निकालावर निश्चितच प्रभावी ठरणार आहे.
स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत झालेली उमेदवारांची निवड आणि निवडणुकीच्या आखाड्यात झालेली बंडखोरी ही सगळ्यात प्रभावी ठरण्याची शक्यता आहे,मात्र काही ठिकाणी वरीष्ठांनी ही बंडखोरी जागीच खेचली तिथे सकारात्मक निकाल येऊ शकतात परंतु जिथे वरिष्ठांनीच ह्या बंडखोरीला खतपाणी घातले तिथे , दोनपैकी एक किंवा एकामुळे दोघांनाही मतदार बाहेरचा रस्ता दाखवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
काही ठिकाणी जून्या जाणत्या उमेदवारांना त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा संधी मिळण्याची शक्यता असून काही ठिकाणी त्यांच्या कार्याची मोजदाद करीत नाकारले जाण्याची शक्यता बळावली आहे.
सुज्ञ आणि चाणाक्ष मतदार प्रत्येकाला यशापयशाच्या तराजूत बरोबर जोखायला लागला असून काही प्रमाणात अजूनही आश्वासनांना भुलथापांना बळी पडणारे मतदार कोण चांगला कोण वाईट,कोण योग्य कोण अयोग्य याचा विचार करण्याच्या पलीकडे गेले असून शेवटच्या क्षणी आपले मत कुणालातरी देऊन आपल्याच पायावर धोंडा मारुन घेत आपले भविष्य अंधारात ढकलतांनाही बघायला मिळत आहे.
अशा या चक्रव्यूहात प्रत्येक मतदार फसवला,ढकलला जातो आहे ,मात्र या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आता मतदारच शोधू लागले आहे परिणामी येणारा निर्णय कदाचित धक्कादायक परंतू मतदारांच्या सकारात्मक जागृकतेची चुणूक दाखवणारा असणार याबाबत दूमत असणार नाही.
शेवटचे काही क्षण, क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवत राहणार आहे आणि तो एक क्षण , ज्याक्षणी निकाल घोषित होईल आणि विजयी उमेदवार घोषित होईल त्या क्षणाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत......तो क्षण अनुभवायला आम्हालाही आनंद घ्यायला आवडेल................... आणि म्हणूनच इथे थांबतो.....पण यशापयशाच्या तराजूत कोण कुठे बसवला गेलाय ह्याचा लेखाजोखा घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासोबत असणार आहोत तोपर्यंत....वाट बघा,...... लवकरच येतोय.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️
Comments
Post a Comment