"दिव्यांग,अनाथ ,गरजूंकरिता गीत गाता चल संगीत उत्सव कार्यक्रमाचे आयोजन"

 "दिव्यांग,अनाथ ,गरजूंकरिता गीत गाता चल संगीत उत्सव कार्यक्रमाचे आयोजन"   

चंद्रपूर:- दीपक देशपांडे 

स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे नुकताच महान संगीतकार यांनी स्वरबद्ध केलेल्या गीत संगीताचा कार्यक्रम *"गीत गाता चल संगीत उत्सव"* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.

 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.प्रदीप अडकिने, सुभाष शिंदे, दुष्यंत नगराळे,अशोक नंदुरकर, किशोर तळवेकर, बोरीकर साहेब, सुभाष साबळे, प्रकाश कुंटेवार,अर्चना मानवलकर मॅडम यांची उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते दीप-प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

या कार्यक्रमात अनाथ,अपंग, गरजू व्यक्तींना व्हिनस कल्चरल ग्रुप तर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमास गायक कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजात सुंदर गीते सादर केले त्यात राजेश धोंगडे, मोहम्मद रफीक , विश्वास तग्रपवार, विनोद बुटन ,ज्योती तोहगावकर,रश्मी हिवरे,शोभना शेख,सारिका नाकाडे, रिद्धी राऊत,रजनी परसराम,नेहा महंती, रागिनी धोंगडे,तर सहगायक म्हणून भूषण पिंपळशेंडे,अतुल किन्हेकर,रुपेश बावणे यांचा समावेश होता. प्रेक्षकांनी गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन व्हिनस फ्रेंड्स कल्चरर गृप आणि निसर्ग बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था चंद्रपूरचे विकास पडगेलावर, नितीन नंदनावर, सुशील तळवेकर, शब्बीर शेख, सुदेश भालेकर यांनी केले.साऊंड सिस्टीम निखिल गटल्लेवार,लायटिंग श्रीकांत पारशिवे यांनी केले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश नंदुरकर यांनी केले आणि सूत्रसंचालन अस्लम खान यांनी केले तर आभार विकास पडगेलवार यांनी मानले.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.