रांगोळीच्या माध्यमातून मतदार जागृती
रांगोळीच्या माध्यमातून मतदार जागृती
दीपक देशपांडे
रांगोळी साकारून मतदान करण्याचा संदेश:-मूल येथील आधार केंन्द्र व सेतू केंन्द्र तहसील कार्यालय मूलचा मतदार जागृतीसाठी उपक्रम
बल्लारपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी विविध उपक्रम राबवून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. मूल येथील आधार केंन्द्राच्या वतीने जनतेला मतदान करण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
"मतदान हा आपला अधिकार आहे, तो आपण पार पाडला पाहिजे' असा संदेश देत मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत शाळा, विविध संस्था, संघटना प्रयत्न करत आहेत तसेच मूल येथील आधार केंन्द्र व सेतू केंन्द्रानेही मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी पाऊल उचलले आहे.या वेगळ्याच उपक्रमांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच मार्गदर्शन केले जात आहे.
दिवाळी व इतर सण-उत्सवाच्या काळात रांगोळी काढून विविध संदेश देत असतात. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांगोळी साकारून जनतेला मतदान करण्याचा संदेश देत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी गुरूवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी आपल्या तहसील कार्यालयातील आधार केंन्द्र व सेतू सुविधा केंद्राच्या समोर रांगोळी साकारून "विधानसभा निवडणुकीत आपले मतदान हे मोलाचे आहे', "एक दिवस मतदानासाठी लोकशाहीच्या हितासाठी', "आपल्या मताचे दान, आपल्या लोकशाहीची शान', "माझे मत माझा अधिकार, अशा संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करणारी रांगोळी साकारली. मूल तहसील मध्ये येणाऱ्या नागरीकां कडून उपक्रमाचे कौतूक होत आहे.
मतदानासाठी आधार केंद्र चालकांकडून जनजागृती केली जात आहे. मतदानासाठी करण्यात येणाऱ्या जनजागृतीच्या प्रयत्नांना नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. मूल येथील प्रशासकीय भवन परिसरात येणाऱ्या नागरिक व अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमाची प्रशांसा केली आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment