कालची रात्र राड्याची, आणि आजची रात्र जागरणाची?

 कालची रात्र राड्याची, आणि आजची रात्र जागरणाची? मतदानाला जायचयं आपला हक्क बजावायचायं !

सुयोग्य उमेदवारांची निवड आपल्याच हाती.

मूल;-दीपक देशपांडे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४चा शंखनाद झाल्यापासून मूल शहर दररोज नवनवीन घटना आपल्या कवेत सामावून घेत आहे ,त्यांचे मुख्य कारण म्हणजे या मतदारसंघात भाजप महायुतीच्या सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी.

विविध राजकीय विचारधारा तर कधी राजकीय  पक्षांतील अंतर्गत कलह. तर कधी महा- युती सोडून , महाविकास आघाडीच्या उमेदवारी वरुन राजकीय कलह या विद्रोहांचे कारण बनू बघत होते , आणि त्याचे पर्यवसान निवडणूक काळात दररोज घडणाऱ्या घटनांतून बघायला मिळतच होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून सुरू झालेल्या चढाओढीचा परिणाम कुठेतरी प्रचार मोहीमेत दिसेल अशी  सगळ्यांनाच शंका आणि खात्री वाटतच होती ,मात्र प्रचार मोहीम शांतपणे पार पडली , प्रचार तोफा थंडावल्या आणि सुरु झाला, गुप्त प्रचार आणि भेटीगाठी........

याच काळात दीड दिवसांचा संयम बाळगण्याची आवश्यकता असते मात्र प्रचार तोफा थंडावल्यावर मतदारसंघातून सगळीकडून आलेल्या अहवालाचे पडसाद उमटले ते येरगाव येथील  पहिल्या भेटिगाठीवरुन  आणि  त्याचा पाठलाग  व शेवट कोसंबी येथे घडलेल्या मध्यरात्रीच्या घटनेने प्रकरणाने वेगळेच वळण घेतले ,मग काय?  

महायुतीच्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला कोसंबी गावात पाचारण केले ,आपले म्हणणे आणि जनभावना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या तर काॅंग्रेसच्या वतीने मूल पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आणि घोषणा बाजी करीत सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात व भाजपचे कार्यकर्ते यांचे विरोधात कारवाई करण्याची मागणी केली गेली तोपर्यंत पहाट झाली होती.पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोग चौकशी करून काय तो योग्य निर्णय घेणार, याबाबत दूमत नसावे.

 मात्र तिकडे कोसंबी वासीयांनी रात्र जागून काढली आणि दिनांक १९/११/२०२४ची पहाट उगवली ती.....

ना.मुनगंटीवार यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न दुर्देवी..!

आणि....

पराभवाच्या भितीने मुनगंटीवारांची तो मी नव्हेच नाटीका

जनतेची दिशाभुल करणाऱ्या मुनगंटीवार पासुन जनतेनी सावध राहावे- काँग्रेस तालुकाध्यक्ष  यांची विनंती

गुंडगिरी करणाऱ्या रावतांच्या कार्यकर्त्यांना महिलांनी धू.. धू.. धुतले..

यांसारख्या बातम्यांनी आणि बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच विषयाने चर्चेला उधाण आणले..

तिकडे निवडणूक आयोगाने मतदानासाठी जय्यत तयारी करुन चमूंसह मतपेट्या (ईव्हीएम,व्हिव्हीपॅट)व इतर साहित्य देऊन बसेसने चमू विशेष  पोलीस कुमक सह मतदारसंघातील मतदान केंद्राकडे रवाना केल्या.

इकडे राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोपांचे विशेष सत्र , घटनास्थळी घडलेल्या प्रसंगावर आधारित व्हिडिओ , पत्रकारांचे ग्राउंड रिपोर्ट , उमेदवारांचे मत आणि आवाहन सारेकाही या घटनेचा नेमका फायदा कसा करुन घ्यायचा यासाठी प्रयत्न करणारे, नानाविध लेख,मालिका प्रसिद्ध होऊ लागल्याने जनतेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

मतदान अधिकारी मतदारसंघातील मतदान केंद्रावर दाखल होऊन प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे.

मात्र आजची रात्र मतदार , मतदान अधिकारी,राजकीय पक्ष, कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच उमेदवारांसाठी जागते रहो चा इशारा देत आहे. त्यामुळेच आजची रात्र वैऱ्याची आणि क्षणाक्षणाला घडणाऱ्या घटनांची नोंद ठेवणारी जागत ठेवणारी असणार आहे.

उद्या सकाळी ७वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार असून प्रशासनाने मतदार राजाला त्यांचे नाव व नंबर असणाऱ्या स्लिपचे वाटप केलेले आहे , मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची व मोठ्या रांगा लागल्यास मतदारांना बसण्याची सोय केली असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे ,मात्र मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे मज्जाव केला असून , मंजूर १२ वैध ओळखपत्रांपैकी कुठलेही एक ओळखपत्र सोबत बाळगण्याची अट घातली आहे. तेव्हा ओळखपत्र सोबत न्यायला विसरू नका आणि टाळता आले तर मोबाईल सोबत नेणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 उद्या दिवसभरात मतदान शांततेत पार पाडण्यासाठी शक्यते सगळे प्रयत्न पूर्ण केले आहेत,आता मतदान शांततेत पार पडावे ही अपेक्षा करूया.

मतदान हा आपला हक्क आहे आणि समाजहितासाठी झटणाऱ्या प्रामाणिक उमेदवाराची निवड करुन आपल्याला मिळालेल्या या अधिकाराचा सुयोग्य वापर करावा  व योग्य उमेदवार निवडून पाठवावा,असे आवाहन आम्ही  Ddbatmi@m2M च्या वतीने करीत आहोत.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.