मतदानाला सुरुवात.
७२,बल्लारपूर मतदारसंघात मतदानाला सुरुवात
दीपक देशपांडे
७२, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून निवडणूक आयोगाने सगळी व्यवस्था चोख ठेवली असून या निवडणुकीत तिसरा डोळा या निवडणुक प्रक्रियेवर नजर ठेवून आहे.
मूल शहरातील केंद्र क्रमांक ९९ मध्ये बरोबर ७वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे तर केंद्र क्रमांक १००वर ही प्रक्रिया ७.१५वाजता सुरू झाली.
सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून येत असून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावायला स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर येत आहेत , काही मतदारांची नावे मतदार यादीत सापडत नसल्याने यादीत नाव शोधण्यासाठी मतदार प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले.
मूल येथील केंद्र क्रमांक १००इथे मूले माजी नगराध्यक्ष सपत्नीक मतदानासाठी आले होते आणि त्यांनी प्रतिक्षेनंतर आपल्या मतदानाचा हक्क बजावला, असून आम्ही या दोन्ही मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या पहिल्या मतदारांना टिपले आहे
एकुण शांततापूर्ण वातावरणात या मतदानाला सुरुवात झाली आहे.आणि जनतेचा उत्साह बघण्यासारखा आहे.जसजसा सूर्य वर येईल तसतसा मतदारांमधील उत्साह आणि टक्केवारी कळू लागेल.
आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय असेच काही क्षण ,विशेष खाचाखोचा, या प्रक्रियेत जाणवणारे आनंददायी क्षण आणि त्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️*

Comments
Post a Comment