निवडणूक आखाडा:-काॅंग्रेसच्या मदतीला राष्ट्रवादी (शपग) काॅंग्रेस नेते?

निवडणूक आखाडा:-काॅंग्रेसच्या मदतीला राष्ट्रवादी (शपग) काॅंग्रेस नेते?

कोण कुणाला तारणार...?


दीपक देशपांडे.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ नितेश कराळे यांनी पोंभुर्णा  येथे  ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या  दिवशी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर तोफ डागली..त्यात जनतेला  काही गवसले तर काही निसटून गेले कारण .... या देशातील ८५% लोकांच्या हिताचा विचार करणाऱ्या काँग्रेसच्या संतोषसिंह रावत यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन  त्यांनी यावेळी केले. यावेळी मंचावर संतोषसिंह रावत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. पोंभुर्णा तालुक्यातील शेकडो मतदार श्रोते उपस्थित होते.

सभास्थानी जनता कुजबूज करीत होती ,८५%जनतेचा विचार करणारी काॅंग्रेस सत्तेपासून १० वर्षांपासून दूर कां आहे ? आणि काॅंग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी च्या कुबड्यांचा आधार कां घ्यावा लागतोय? आणि काॅंग्रेसच्या उमेदवाराला उमेदवारी मिळवण्यापासूनच एवढा विरोध कां?

एकंदरीत  नेता कोणताही असू द्या तो कोणत्या प्रसंगी  काय बोलतो हे न समजण्याएवढी जनता नासमज नक्कीच नाही, पण यांतून कोण काय विचार करतो हे मात्र नक्की समजून घेण्यासारखे आहे. आता निवडणुक चक्रव्यूहात घोडे उधळले आहेत ते यांतून बाहेर कसे पडणार यासाठी २०नोव्हेंबर ला मतदान होणार असून २३नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल लागणार आहे.

तोपर्यंत....... आम्ही मागोवा घेत राहणारच आहोत ,आपली साथ मिळेलच ही आशा.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.