पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी सजग राहावे-डॉ.अनिता वाळके

 पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी सजग राहावे-डॉ.अनिता वाळके

 कर्मवीर महाविद्यालय मूल येथे पालकसभा मोठ्याथाटात संपन्न 


मूल -दीपक देशपांडे 

शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे २८ सप्टेंबरला पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता वाळके,पालक प्रतिनिधी श्रीमती काजल दुधे, श्री स्वप्नील आत्राम,श्री यादव राऊत,श्री बोदेले,डॉ. केवल कऱ्हाडे,प्रा.प्रवीण उपरे विचारपीठावर उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.प्रवीण उपरे यांनी  पालक सभा आयोजनाचा उद्देश स्पष्ट  करतांना  पालकांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आपल्या पाल्याच्या शैक्षणिक समस्या तसेच प्रगती विषयी पालक शिक्षक संवाद घडून येण्या करीता पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते असे विचार व्यक्त  केले तसेच श्री.स्वप्नील आत्राम आणि  श्रीमती काजल दुधे यांनी आपल्या मनोगतात पाल्याच्या प्रगतिविषयी समाधान व्यक्त केले,तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन काही सूचना केल्या.डॉ. केवल कऱ्हाडे यांनी आपल्या भाषणात आमचे महाविद्यालय हे कायमच विद्यार्थी विकासाकरिता अविरत प्रयत्नशील असते तसेच  स्पर्धा परीक्षेविषयी  वेळोवेळी व्याख्यान व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करीत असते असे मत विशद केले. 

          प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित  पालकांशी संवाद साधत असताना पालकांच्या सूचनांचे स्वागत केले व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. महाविद्यालयातील विविध विभाग विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगती सोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणारे  उपक्रम राबवित असते,हे महाविद्यालय तालुक्यातील प्रथम व नामाकिंत असून शैक्षणिकदृष्टया  प्रगत आहे आणि आमचे  महाविद्यालयाला नॅक B+ दर्जा प्राप्त  असून गेली ५५ वर्षापासुन अखंडीत सेवा देत आहे. येथील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठमोठया पदावर पोहचले असुन देशसेवा करीत आहे असे बहुआयामी अष्टपैलू  व्यक्तीमत्त्व घडविणारे व विविध  सुप्त गुणांना चालना देणारे हे कर्मवीर महाविद्यालय आहे असे  विचार प्रतिपादीत  करुन  पुढेही आपल्या विद्यार्थाचे हित लक्षात घेऊन कार्य करीत राहणार अशी ग्वाही दिली व पालकांनी सुद्धा शिक्षक व प्राचार्य यांच्या भेटी घेऊन आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतिविषयी सजग राहावे असा मौलिक  सल्ला आपल्या अध्यक्षीय भाषणात दिला.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. गणपत आगलावे सर तर आभार प्रा.कमलेश नागोसे यांनी मानले.पालक ,विद्यार्थी व शिक्षक याच्यांत कायमचा सुसंवाद घडवुन यावा या उद्देशाने पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

     ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.