कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आजची एक शेवटची संधी
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आजची एक शेवटची संधी
दीपक देशपांडे
सन २०२३ खरिप हंगामाधील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२० हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रू.१०००/- तर ०.२० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रू. ५०००/- ( २ हेक्टर मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येत आहे. ज्या कापुस व सोयाबीन शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरिप हंगामामध्ये ई पिक पाहणी ॲप/पोर्टलद्वारे कापुस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्य करिता पात्र असून सन २०२३ खरिप हंगाममध्ये ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जमाबंदी आयुक्तालयकडून प्राप्त झाली असून सदर शेतकरी पात्र आहेत. DBT द्वारे आधार लिंक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे
*यासाठी आवश्यक कागदपत्र*
१. संबंधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड
२. आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत संबंधित शेतकऱ्याचे संमती पत्र
३. सामाईक खातेदाराच्या बाबतीत एकच खातेदारास अर्थसहाय्य वितिरीत करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा ना हरकत प्रमाणपत्र *(affidavit)*
तरी संबंधित यादीतील राहिलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी वरील आवश्यक कागदपत्र दिनांक 28/09/2024 पर्यंत संबंधित गावचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावे ,अन्यथा ते या योजनेचा लाभ मिळवू शकण्यासाठी पात्र असतीलच असे नाही,अशी माहिती प्राप्त झाली आहे.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2M✍️
-

Comments
Post a Comment