संघर्षातून ध्येयपूर्तीसाठी लढणारा तरुण:-प्रमोद मशाखेत्री!
संघर्षातून ध्येयपूर्तीसाठी लढणारा तरुण -प्रमोद मशाखेत्री सन्मानित.
दीपक देशपांडे मूल
भारत सरकारच्या सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने मुल येथील प्रेरणा ऑनलाईन आपले सरकार सेवा सेतू केंद्राचे संचालक प्रमोद मशाखेत्री यांना पिएम विश्वकर्मा लाभार्थी स्वनिधी योजनेचे प्रमाणपत्र देवून त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.
नूकतेच त्यांना भारत सरकारच्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या वतीने प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. तसेच त्यांना वेंडर क्रमांक मिळालेला आहे. मागील अनेक वर्षापासून प्रमोद मशाखेत्री हे फुटपाथवर दुकान टाकून सेतू केंन्द्र चालवित आहेत. त्यांनी सेतू केंन्द्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत.त्यांचा फायदा शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना होत आहे. त्यांनी कोरोना काळात विश्वकर्मा योजने मध्ये गरजूंना स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला म्हणून प्रयत्न केलेला होता.त्याची दखल घेवून सुक्ष्म, लघू ,मध्यम मंत्रालयाने त्यांना उद्यम असिस्टंट सटीफिकेट प्रदान केलेले आहे.
त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. प्रमोद मशाखेत्री यांनी अत्यंत बिकट परिस्थितीतून एका खेड्यातून मूलमध्ये धाव घेतली पदवी व पदव्यूतर शिक्षण पूर्ण केले असून ते पंचायत समिती समोर मागील कित्येक वर्षापासून फुटपाथवर आपला व्यवसाय करीत आहे.
विश्वकर्मा योजनेमध्ये त्यांना प्राथमिक स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज स्वरूपात स्टेट बॅंक आफ इंडीया मूल मधून मिळाले, या कर्जाची बारा महिन्यात नियमित कर्ज परतफेड केल्यामुळे शासनामार्फत दुसऱ्या वर्षात वाढीव कर्ज २०००० रुपये मिळाले. तेही कर्ज त्यांनी वेळेत परतफेड केले आहे. आता त्यांनी स्टेट बँकेकडे पन्नास हजार रूपये कर्जासाठी अर्ज केलेला आहे .
केवळ नौकरीच्या मागे न लागता स्वयंपूर्ण बनण्यासाठी नागरिकांचा सन्मान सामर्थ्य समृध्दी ही पिएम विश्वकर्मा योजनेची उद्दिष्ट आहे. तसेच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आत्मसन्मानाने, आत्मबलाने आणि परीश्रमाने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव केलेला आहे. त्यामध्ये सहभागी प्रमोद मशाखेत्री यांचे पुढील आत्मनिर्भरतेचे स्वप्न पूर्ण होणाच्याा मार्गावर असून, आज ते स्वतःच कुटुंब सांभाळत असताना इतर अनेक तरुणांना प्रशिक्षण देत त्यांचेही कुटुंब चालविण्यासाठी या तरुणांना मदत करीत आहेत. स्वयंनिर्भरतेचा धडाही ते यानिमित्ताने देत आहेत.
पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील विकसीत भारत साकारण्यासाठी ते अग्रेसर असल्यामुळे मूल परिसरात एक लघू उद्योजक म्हणून त्यांची शासकीय नोंद झालेली आहे आणि त्त्यांचे कार्याबद्ल त्यांचे समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Ddbatmi@m2m च्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा व अभिनंदन आणि यशाची कामना.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2M✍️


प्रमोद भाऊ म्हशाखेत्री आपले खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
ReplyDelete