अखेर प्रशासकीय यंत्रणेलाही समाजमाध्यमांचाच आधार?
अखेर प्रशासकीय यंत्रणेलाही समाजमाध्यमांचाच आधार पण....?
तालुका दंडाधिकारी आणि समितीच्या अध्यक्ष सचिवांनी दखल घेणे आवश्यक. ---लाभार्थ्यांची मागणी
ह्या आशयाचे संदेश मी समाज माध्यमांवर बघितले,मात्र आताचा हा निर्णय समितीचा नाही".:-वंदना आगरकाटे, अध्यक्षा संजय गांधी निराधार योजना मूल.
लाभार्थ्यांनी कुठल्याही फोनवरच्या चौकशीला उत्तर देऊ नये,प्रत्यक्ष तहसील कार्यालयात संपर्क साधावा -दीपक देशपांडे, अध्यक्ष ग्राहक पंचायत मूल.
मूल ,दीपक देशपांडे
काल दिनांक २०/०९/२०२४रोजी विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या समाज माध्यमांवर श्रावण बाळ, आणि संजय गांधी निराधार योजना चा लाभ मिळणाऱ्या ७ पेजेसवरील शेकडो जणांच्या नावांची यादी आणि त्याखाली एक संदेश "या लाभार्थ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आणि त्या झेरॉक्स वर मोबाईल नंबर लिहून पाठवावे . सदर झेरॉक्स तलाठी कार्यालय मूल येथे आणून देण्यास सांगावे ही विनंती" अशा आशयाचा संदेश वायरल करण्यात आला. नेमका तो कुठून आणि कसा वायरल झाला हा शोधाचा विषय आहे.
सामाजिक कार्यकर्त्यानी एका चांगल्या भावनेने हे संदेश समाज माध्यमांवर वायरल केलेत, याबाबत शंका नाही परंतू हा संदेश वायरल करतांना जे सामाजिक भान जपायला पाहिजे होते ते जपल्या गेले नाही,अशा तक्रारी डीडिबातमीपोर्टल, व ग्राहक पंचायत मूलकडे काही लाभार्थ्यांनी केलेल्या असून ही यादी जाहीर करणाऱ्या यंत्रणेने त्यातील गोपनीयता पाळण्याचे भान ठेवले नाही आणि नंतर तो संदेश वायरल करतांना सामाजिक कार्यकर्त्यानीही ते भान ठेवले नाही असे या लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना ह्यापैकी एका तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की ,आमचे नावांची यादी जाहीर केली असती तर ते ठिक होते परंतू त्यासोबतच मोबाईल क्रमांक व खातेक्रमांक जाहिर करण्याची आवश्यकता नव्हती ,असे त्यांचे म्हणणे असून याचा फायदा घेत कुणी फोन करुन त्या निराधार खातेदारांना आधार क्रमांकाची मागणी करुन नंतर फसवणूक करण्याची शक्यता विचारात घेता अशी शंका व्यक्त केली गेली आहे. आम्हालाही यात तथ्य आहे असे वाटते,आणि यांची दखल तालुका दंडाधिकारी आणि समितीच्या अध्यक्ष, सचिवांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे. व जनतेनी याच कारणासाठी कुणाकडून फोनवर विचारणा झाल्यास त्यावर कुठलीही माहिती देऊ नये असे आवाहन दीपक देशपांडे,अध्यक्ष ग्राहक पंचायत मूल यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रशासनाला याबाबत तातडीने उपाययोजना करतांना अडचण आल्यास एक प्रेस नोट काढून प्रसिद्धी माध्यमांना माहिती देऊनही याबाबत जनजागृती करता आली नसती काय?असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला गेला आहे.
याबाबत संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षांना विचारणा केली असता "ह्या आशयाचे संदेश मी समाज माध्यमांवर बघितले आणि तहसीलदार यांचेशी भेटिचा प्रयत्न केला पण काल त्या जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंगमध्ये व्यस्त असल्याने भेट झाली नाही मात्र याबाबत उचित निर्णय लवकरच घेतला जाईल, समिती सदस्यांना याबाबत जनतेला माहिती देण्याच्या सुचना बऱ्याच दिवसांपासून दिलेल्या आहेत मात्र हा संदेश अशा पद्धतीने वायरल करण्याचा आताचा हा निर्णय समितीचा नाही".:-वंदना आगरकाटे, अध्यक्षा संजय गांधी निराधार योजना मूल यांनी स्पष्ट केले.
श्रावण बाळ, आणि संजय गांधी निराधार योजना चा लाभ मिळणाऱ्या या यादी मध्ये जर कोणी आपल्या जवळचे असल्यास माहिती द्यावी हि विनंती,अशा आशयाची मागणी करणारे संदेश वायरल करण्यापेक्षा या समितीच्या सदस्यांनी जशी प्रत्येक सभेनंतर कार्यवाही अहवालाची बातमी प्रसिद्धी माध्यमांना दिली जाते तशी प्रेस नोट प्रसिद्धी माध्यमांना देता आली नसती काय?असा सवालही यानिमित्ताने विचारला जातो आहे.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2M✍️


अगदी योग्य
ReplyDelete