मूलमध्ये आज कन्यका मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा !
मूलमध्ये आज कन्यका मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा !
अयोध्येचे प.पु.स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची उपस्थिती
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आयोजन .
दीपक देशपांडे
परमेश्वर कृपेने मूल नगरीतील जुन्या प्रसिद्ध महादेव मंदिराचा व माता वासवी कन्यका माता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून साक्षात परमेश्वर साक्षीने, परमोच्च मंगलमंत्रघोषात तसेच शास्त्रोक्त विधीविधानानुसार प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.
यासाठी दिनांक १४सप्टेंबरपासून विधिवत सोहळा सुरू झाला आहे, त्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार मूल नगरीत पूर्ण वेळ उपस्थित आहेत ,व नगरातील जवळपास सगळ्याच गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत ,
गणेशाचे पूजन करुन ,प्रसाद चढवित आहेत, त्यामुळे जनतेशी जवळीक व जनसंपर्क साधला जात आहे, यामुळे मूल नगरीतील भाजप पदाधिकारी व वार्डातील जनता एक आगळावेगळा अनुभव घेताना दिसत आहे.
या मंदिरात श्री.गणपती , श्री.माता कन्यका, श्री.महादेव ,संत श्री साईबाबा, श्री.गजाननमहाराज , सद्गुरू श्री.दत्तात्रेय , संकटमोचक श्री हनुमानजी तसेच नवग्रह मुर्तीची प्रतिष्ठापना प.पु.श्री. स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज ,कोषाध्यक्ष, राम मंदिर समिती अयोध्या यांच्या शुभहस्ते आज दिनांक १६ सप्टेंबर २०२४रोजी संपन्न होणार आहे.
यानिमित्ताने मूल नगरीत सकाळी ८ वाजता भव्यदिव्य शोभायात्रा , दूपारी १२.३०वाजता प्राणप्रतिष्ठा, दूपारी ३.३०वाजता दिव्य प्रवचन व सायंकाळी ६.३० ते १०.३० महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन सौ.सपना व सुधीर मुनगंटीवार यांनी व कन्यका परमेश्वरी देवस्थान ट्रस्ट मूलच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यासाठी नगरातील सोमनाथ मार्गावरील कन्यका मंदिर ते गांधी चौक मूल ध्वनीक्षेपक लावण्यात आले असून रस्त्याच्या दुतर्फा स्वागत करण्यासाठी मोठमोठे बॅनर्स व पोस्टर लावण्यात आले आहेत.प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मंत्रघोष व इतर विधीची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सोय करण्यात आली आहे.तर स्थानिक बाजार चौकात भव्यदिव्य शामियाना उभारण्यात आला आहे. या सोहळ्यामुळे गांधी चौक ते कन्यका चौक हा मार्ग तीन दिवसांपासून व्हिव्हिआयपी मार्ग बनलेला असून , नगरप्रशासनाने स्वच्छता मोहीम अग्रक्रमाने राबविली असून ,तगडा पोलिस बंदोबस्त व दिवसभरात सायरनचे आवाज ऐकायला मिळत आहेत व गाड्यांचा ताफा ही या रस्त्यावरून धावताना दिसत आहे.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2M✍️


Comments
Post a Comment