नगरपरिषदेचे व पोलीस प्रशासनाचे वतीने सक्त ताकीद दिल्यानंतर मोकाट डुकरांचे पकडसत्र सुरु

मूल  नगरपरिषदेचे व पोलीस प्रशासनाचे वतीने सक्त ताकीद दिल्यानंतर मोकाट डुकरांचे पकडसत्र सुरु

कार्यवाही बाबत जनता साशंक ,प्रशासनाची तंबी,आणि वराह पालनकर्ते सहकार्याच्या तयारीत



दीपक देशपांडे

मूल शहरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढल्याच्या तक्रारी मागील दोन वर्षांपासून सुरू होत्या ,मात्र नगरपरिषदेचे वतीने कंत्राट दिल्यानंतर , वाशीम , व अजून दुसऱ्या एका ठिकाणच्या कंत्राटदाराने त्या कंत्राटाचे पालन न केल्याने ही मोहीम थंडबस्त्यात गुंडाळल्या गेली होती. आता नागपूर येथील कंत्राटदार तयार झाला आहे परंतू त्याला कार्यवाही करताना अडथळा येऊ नये यासाठी व जनतेच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच होत्या,तसाच या मोकाट डुकरांचा त्रासही वाढत होता , नगर प्रशासन या डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी लक्षात घेऊन नवीन कंत्राटदाराचा शोध घेत होते  मात्र कंत्राटदार मूल शहरात येण्यासाठी तयार होत नव्हते ,झाले तरी हे वराह पालन करणारे त्याला काम करु देत नव्हते शेवटी एक कंत्राटदार तयार झाला मात्र पून्हा  एकदा वराह पालन करणारे व कंत्राटदार यांच्यात वाद होऊन तोही कंत्राटदार ही मोहीम अर्धवट सोडून जाण्यापूर्वी नगरप्रशासन , पोलीस प्रशासन व वराह पालन करणारे यांची एक सभा आयोजित करुन वराह पालन करणारे यांना सक्त ताकीद देत वराह पालन कर्त्यांनी स्वतः या वराहांचा बंदोबस्त करण्याची एक संधी देण्यात आली परिणामी आज सकाळपासून या मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम वराह पालन करणाऱ्यांनी सुरू केली  आहे.

सोमनाथ मार्गावरील  या मोहिमेमुळे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या, उकिरड्यावर घाण करणाऱ्या या डुकरांच्या हैदोसापासून जनतेला सुटकेचा श्वास घेता येणार आहे. प्रशासनाने ठरवले तर ते अशक्य वाटणारी गोष्टही चुटकीसरशी सोडवू शकतात हेच या प्रकरणातून पुढे येत आहे ,मात्र ते करण्याची इच्छाशक्ती हवी आणि अशा गोष्टींसाठी जनता नेहमीच तयार असते हा विश्वास.

नगरप्रशासनाच्या  वतीने वराह पालन करणाऱ्यांनी त्यांच्या डुकरांना गावात मोकाट न सोडण्याची तंबी दिली आहे तर  ही मोहीम किती काळ सुरू राहणार आणि जनता मोकळा श्वास घेऊ शकणार हा एक अनुत्तरित प्रश्न असणार आहे ,मात्र जनतेच्या वतीने या कार्यवाहीचे सद्यस्थितीत स्वागत करण्यात येत आहे

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.