आला श्रावण आला
आला श्रावण आला !
दीपक देशपांडे
![]() |
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.
“यंदा श्रावण महिना हा ५ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू होतोय व २ सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे. यंदाच्या श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना हा सोमवार पासूनच होत आहे. या महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत.
खगोलीय महत्व
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो. तमिळ कॅलेंडरमध्ये तो अवनी म्हणून ओळखला जातो आणि सौर वर्षाचा पाचवा महिना असतो. चंद्र धार्मिक कॅलेंडरमध्ये श्रावण हा अमावस्येपासून सुरू होतो आणि तो वर्षाचा पाचवा महिना असतो. श्राबोन (बंगाली: শ্রাবণ; श्रवण देखील म्हणतात) हा सौर बंगाली कॅलेंडरचा चौथा महिना आहे. तसेच नेपाळी कॅलेंडरचा चौथा महिना असतो. श्रावण हा वर्षा ऋतुचा(पावसाळ्याचा) दुसरा महिना असतो.
श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात शिवाची आराधना केली जाते. या महिन्यात उपवासाला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात उपवास केल्याने शिवाची कृपा प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
श्रावण महिन्यात सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्रावण महिन्यात शिवभक्त दर सोमवारी उपवास करतात व शिवमूठ वाहतात पण तुम्हाला माहिती आहे का, यंदा श्रावण महिना केव्हापासून सुरू होतोय? श्रावण महिन्यात किती श्रावण सोमवार आहेत? आणि प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूठ वाहावी? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
“यंदा श्रावण महिना हा ५ ऑगस्ट २०२४ सुरू होतोय व २ सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे. यंदाच्या श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना हा सोमवार पासूनच होत आहे. या महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत. या महिन्यात शिवाचा महारुद्रभिषेक करावा. नियमित व्रत करावे. शिवाचा अभिषेक करत १०८ वेळा रोज बेल वाहावे.”
प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूठ वाहावी?
“खाली सांगितल्याप्रमाणे दर सोमवारी शिवमुठ वाहावी.”पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ वाहावे.दुसऱ्या सोमवारी शिवमूठ तीळ वाहावे. तिसऱ्या सोमवारी शिवमूठ मूग वाहावे. चौथ्या सोमवारी शिवमूठ जव वाहावे. पाचव्या सोमवारी शिवमूठ हरभरा वाहावे.” लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिले पाच वर्षे मंगळागौरीचे पूजन करावे. श्रावण महिन्यात श्री शिवलिलामृत अकरावा अध्याय रोज वाचावा. जर शक्य नसेल कर तुम्ही दर सोमवारी सुद्धा हा अध्याय वाचू शकता.”
श्रावणात ७२ वर्षांनी आलेला योगायोग काय आहे
श्रावणाची सुरूवात सोमवारी होणं हे शुभ मानलं जात आहे. कारण, भगवान शंकरांचा वार सोमवार आहे. तर ७२ वर्षांपूर्वी म्हणजे १० ऑगस्ट १९५३ मध्ये श्रावणाची सुरूवात सोमवारी झाली होती. आता इतक्य वर्षांनी हा योग जुळून आला आहे,त्यामुळे हे शुभ मानले जात आहे.
श्रावणात आहेत इतके शुभ दिवस
श्रावणात नागपंचमी,रक्षाबंधन,विनायक चतुर्थी,संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी आणि कालाष्टमी, श्रीयाळ षष्ठी असे सण आहेत. त्यामुळे हा महिना सण-समारंभांनी भरलेला असतो.
लहानपणापासून ऐकलेल्या गाण्याची सत्यता याच महिन्यात अनुभवायला मिळते आणि सहजपणे मुखातून शब्द बाहेर पडतात...... श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे....
अशा या आल्हाददायी महिन्यात सगळ्यांना आनंद , उत्साह अनुभवायला मिळाला हीच अपेक्षा.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment