मूल तालुक्यातील गुणवंत शेतकऱ्याचा मुलगा बनला डॉक्टर

 मूल तालुक्यातील गुणवंत 

शेतकऱ्याचा मुलगा बनला डॉक्टर




दीपक देशपांडे 

शेतकऱ्यांचा मुलगा बनला डॉक्टर,  नुकताच एका पदवीदान समारोहामध्ये डॉ.वैभव साधना वैशिष्ट वाकडे यांना डॉक्टर ही पदवी देण्यात आली असून  ते जिमलगटा गडचिरोली मध्ये वैद्यकिय अधिकारी म्हणून कार्यरत झाले आहे.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येऊ शकते हे शब्द मूल तालुक्यातील चक दुगाळा एका छोट्याशा गावात राहणाऱ्या मुलाने सत्यात उतरवले आहेत.त्यांच्या या यशाने त्यांचे कुटुंब आनंदी झाले आहे. शेतकरी म्हटलं की घरच्या परिस्थितीची थोडी का होईना जाणिव होतेच अशा परिस्थितीवर मात करीत त्याने आरोग्य  विभागात वैद्यकिय अधिकारी पदावर आपले नाव कोरले आहे.

शेतकरी कुटुंबातील मुलगा डॉ.वैभव वैशिष्ट वाकडे याने आपली ओळख महाराष्ट्राला करुन दिलीय ती म्हणजे डॉक्टर डॉ.वैभव वैशिष्ट वाकडे म्हणुन.  हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी  त्यांनी कोणत्या अडचणींवर मात केली ह्यावर एक दृष्टिक्षेप....

जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या डॉ.वैभव साधना वैशिष्ट वाकडे यांचे गावात दोन खोल्यांच्या घरांत वडील वैशिष्ट वाकडे आई साधना वाकडे व बहीण असे त्यांचे छोटेसे कुटुंब राहते. वैभव चे वडील शेतकरी आणि जोड धंदा म्हणून बरेच दिवस डॉक्टर म्हणून ग्रामीण भागात व्यवसाय करीत असत. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. घरची परिस्थिती बेताची असल्याने वैभव याने जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करत उदिष्टाचा पाठपुरावा करीत ते उदिष्ट सत्यात उतरवले आहे. त्याने हे यश संपादन केल्यानंतर आई वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

मुलाच्या या यशाबद्दल शेतकरी बापाचे उर आनंदाने भरून आले , मुलाच्या  यशामुळे समाजात आमची मान उंचावली आहे असे वडीलांनी म्हटले आहे. आप्तेंष्टांचे खुप फोन येत आहेत. आज सर्व जण सत्कार करताहेत. त्यामुळे खुप भारी वाटत आहे आमच्या घरात असे कधी झालेच नाही. सगळीकडे कौतुक होत असल्याने आनंद झाला आहे.

वैभव याने जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने अतिशय खडतर मेहनत करीत पुढील शिक्षण घेतले. अभ्यासात तो अतिशय हुशार असल्याने त्याने अभ्यास म्हणजे अभ्यासच केला. आत्मविश्वासाने यश मिळवले. मुलाने खरोखरच आमचे नाव मोठे केले असल्याचे वैभव वाकडे यांची आई साधना वाकडे यांनी म्हटले आहे. मुलाच्या यशाबद्दल बोलताना आई वडीलांना गहिवरुन आले होते. त्याच्या आई वडिलांशी डीडिन्यूजचे वतीने संपर्क साधला होता व अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या होत्या.


डॉ.वैभव याच्या यशामुळे मूल तालुक्याच्या यशात मानाचा अजून एक तूरा खोवला गेला असून एक आदर्श निर्माण केला आहे.

केवळ धनाढ्य आणि पैसेवाल्यांची मूलेच डॉ.बनू शकतात या विचारांवर ही या यशाने मात केली असून जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर अशक्य वाटणारी गोष्टही सहजसुलभ प्राप्त करता येते ,हा विश्वास सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये रुजावा हीच अपेक्षा डॉ वैभव  आमचे सोबत वार्तालापात व्यक्त करतात व अडल्यानाडल्यांची सेवा करता येणार असल्याचा आनंद होत आहे असेही स्पष्ट करतात.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️


**

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.